नवी दिल्ली : आधार कार्ड लिंक करण्याच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत बॅक खाते आधार कार्डशी लिंक न केल्यास खाते बंद केले जातील. अनेकांनी बॅंकेच्या शाखेत जावून आधार कार्ड लिंग केले असेल. पण तुमचे खाते आधार कार्डशी लिंक झाले की नाही, हे कसे जाणून घ्याल. याचा एक सोपा उपाय आहे. घरबसल्या तुम्ही याची माहिती करून घेऊ शकता. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा...


काय काय लिंक करणे गरजेचे आहे


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मोबाईल नंबर

  • पॅन कार्ड

  • बॅंक अकाऊंट

  • एलपीजी गॅस कनेक्शन

  • राशन कार्ड

  • वोटर आयडी


खाते लिंक आहे की नाही कसे तपासून बघाल


सर्वात आधी युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईट uidai.gov.in वर जा. त्यानंतर आधार सेवा ‘Aadhaar Services’या सेक्शनवर जा. त्यानंतर आधार कार्डतून बॅंक अकाऊंट लिंक होणाऱ्या स्टेटसच्या ऑप्शनवर जा. म्हणजे ‘Check Aadhaar & Bank Account Linking Status’.


ओटीपीवरून करून घ्या माहिती


त्यावर क्लिक केल्यावर एक नवे पेज ओपन होईल. येथे तुम्हाला १२ अंकांचा आधार नंबर मागितला जाईल. आधार नंबर दिलेल्या जागी भरा. त्यानंतर स्क्रिनवर सिक्युरीटी कोडही दिसेल. तो बघून भरा त्यानंतर तुम्हाला वनटाईम पासवर्ड (ओटीपी) तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल.


लिंक असल्यास मेसेज येईल


ओटीपी त्यात टाकल्यानंतर परत लॉगिंग करा. जर तुमचे बॅंक खाते आधारही लिंक असेल तर तुम्हाला असा मेसेज मिळेल- “Congratulations! Your Bank Aadhaar Mapping has been done”.


ही मिळेल माहिती


स्क्रिनवर खातेधारकाचे नाव, आधार लिंक होण्याचे स्टेटस आणि लिंक करण्याची तारीख दिली जाईल. सरकारने जरूरी कागदपत्रं लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०१८ दिली आहे. आधार किंवा युनिक आयडेंटिटी नंबर १२ संख्यांचा असेल. ते बायोमॉट्रीक डेटावर आधारित असेल.