'या' दुचाकींसमोर चारचाकीही पडतील फिक्या; खरेदीच्या विचारात असाल तर 'हे' पर्याय ठरतील लाखात एक

Auto News : तुम्हीही याच भटकंतीप्रेमींपैकी एक आहात? येत्या काळात तुम्हीही दुचाकी खरेदीचा बेत आखताय? मग ही माहिती तुमच्याचसाठी...   

Jul 08, 2024, 13:19 PM IST

Auto News : भारतीयांचं बाीक रायडिंगवर असणारं प्रेम आणि भटकंतीची वाढती आवड लक्षात घेता ऑटो क्षेत्रामध्येही भारतीयांच्या आवडीनिवडी लक्षात घेत काही महत्त्वाचे बदल आणि निर्णय घेतले जात आहेत. 

 

 

1/7

दुचाकी खरेदी

Upcoming Two Wheelers royal enfield guerrilla bmw ce04 bsa gold star price features latest update

Auto news Upcoming Two Wheelers: दुचाकी खरेदीचा बेत आणखणाऱ्यांसाठी येत्या काही दिवसांमध्ये खास पर्वणी असणार आहे. कारण, नव्यानं लाँच होणाऱ्या दुचाकी इतक्या कमाल आहेत, की या दुचाकी चारचाकी वाहनांहूनही वरचढ ठरणार आहेत. 

2/7

खिशालाही परवडणार...

Upcoming Two Wheelers royal enfield guerrilla bmw ce04 bsa gold star price features latest update

Auto news Upcoming Two Wheelers: खिशालाही परवडणार, चारचौघात उठूनही दिसणार; Two Wheeler खरेदीच्या विचारात असणाऱ्यांसाठी 'हे' पर्याय ठरणार लाखात एक, पाहा लाँच होण्यासाठी तयार असणाऱ्या दुचाकींची यादी 

3/7

Royal Enfield Guerrilla 450

Upcoming Two Wheelers royal enfield guerrilla bmw ce04 bsa gold star price features latest update

17 जुलै रोजी रॉयल एनफिल्डच्या गुएरिल्ला बाईकची पहिली झलक सर्वांना पाहता येणार असून, ही एक रोडस्टर बाईक असेल. हिमालयनचेच फिचर असणाऱ्या या बाईकला लिक्विड कूल्ड शेरपा इंजिन देण्यात आलं आहे.   

4/7

BMW CE 04

Upcoming Two Wheelers royal enfield guerrilla bmw ce04 bsa gold star price features latest update

लक्झरी कार आणि बाईक निर्माती कंपनी बीएमडब्ल्यू येत्या काळात स्कूटर लाँच करणार असून, BMW CE 04 असं या मॉडेलचं नाव. 24 जुलै रोजी ही स्कूटर लांच होईल.   

5/7

Hero Xoom

Upcoming Two Wheelers royal enfield guerrilla bmw ce04 bsa gold star price features latest update

हिरो झूम ही आणखी एक बहुचर्चित स्कूटर असून, एका नव्या रुपात ती लाँच होणार आहे. झूम 125R आणि 125R  160 असे दोन नवे मॉडेल भारतात लाँच होणार असून, लिक्विड कूल्ड इंजिन या स्कूटरचं महत्त्वं वाढवून जातील.   

6/7

BSA Gold Star 650

Upcoming Two Wheelers royal enfield guerrilla bmw ce04 bsa gold star price features latest update

बीएसए गोल्ड स्टार 650 ही 652 सीसीचं लिक्विड कूल्ड इंजिन असणारी बाईक तरुणांमध्ये सध्या बरीच चर्चेत असून या बाईकचा लूक सर्वांचं लक्ष वेधत आहे. 15 ऑगस्ट रोजी ही बाईक लाँच होणार आहे.   

7/7

Ducati Hypermotard 698

Upcoming Two Wheelers royal enfield guerrilla bmw ce04 bsa gold star price features latest update

डुकाटीची नवी हायपरमोटॉर्ड 698 यंदाच्याच वर्षी भारतात लाँच होणार असून, या बाईकला सिंगल सिलेंडर इंजिन असेल. बाईकचं हलकं वजन तिचा लूक आणखी उठावदार करताना दिसेल.