तुमच्या Aadhaar नंबर आणि बायोमॅट्रिकचा गैरवापर टाळणं शक्य, फक्त या स्टेप फॉलो करा
आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे.
मुंबई : आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. आधारशिवाय, आजकाल सरकारी विभागांपासून ते बॅंकेच्या कामापर्यंत सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला आधारकार्डची गरज भासते. पॅनकार्डसाठी अर्ज करायचा असो की आयटी रिटर्न दाखल करावा, सर्वत्र सगळ्यात पहिले कागदपत्र मागितलं जातं ते आहे आधार. परंतु आजकाल सतत आधार कार्डचा गैरवापर होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्याचा गैरवापर होण्यापासून बचाव करण्यासाठी बरीच मोठी पावले उचलली आहेत.
आधार कार्ड सुरक्षितता आणि गोपनीयता
जर तुम्हालाही तुमच्या आधार कार्डसंदर्भात कोणतीही असुरक्षितता जाणवत असेल आणि तुमच्या आधारचा गैरवापर होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधार कार्ड लॉकची सुविधा देखील वापरू शकता. तुमच्या आधार क्रमांकाची गोपनीयता पॉलिसी अनलॉक करू शकता.
UIDAI वेबसाइटवर कसे लॉक करावे
1. यासाठी आपण प्रथम uidai.gov.in वर जावे.
2. आता My Aadhaar मधील आधार सेवा विभागात, Aadhaar Lock and Unblock वर क्लिक करा.
3. Aadhaar Lock and Unblock वर क्लिक करताच एक वेगळं पान उघडेल.
4. येथे तुम्हाला 'Lock UID' ' आणि ''Unlock UID' पर्याय दिसतील, यामध्ये तुम्हाला 'Lock UID'वर क्लिक करावा लागेल.
5. यानंतर त्यात 12 अंकी Aadhaar Card Number (UID) प्रविष्ट करा.
6. यानंतर आपले नाव आणि त्यात पिन कोड प्रविष्ट करा.
7. त्यात स्क्रीनवर दर्शविलेले सुरक्षा कोड प्रविष्ट करा
8. सिक्युरिटी कोड एन्टर केल्यानंतर तुम्हाला ओटीपी किंवा टीओटीपी या दोन्ही पर्यायांपैकी एकावर क्लिक करावे लागेल.
9. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा.
तुम्ही जेव्हा ओटीपी प्रविष्ट करता तेव्हा सबमिट बटण दाबा. यानंतर, 'तुमचा आधार नंबर लॉक झाला आहे' असे तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता आपण प्रमाणीत करणासाठी VID चा वापरत करा.