Kande Pohe Recipe : असं म्हणतात की, दिवसाची सुरुवात करताना पोटभर न्याहारी करावी. आपल्यातले अनेकजण तसं करतातही. थोडक्यात आपल्यापैकी अनेकांनाच ही सवय असते. त्यातही न्याहारीसाठी एका पदार्थाला विशेष पसंती. बरं, कुटुंब मराठमोळं असेल तर हा पदार्थ म्हणजे त्यांच्या घरात चालत आलेली एक परंपराच. हा पदार्थ म्हणजे कांदे पोहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरीच मंडळी अशी आहेत ज्यांच्या दिवसाची सुरुवात ही कांदे पोहे आणि जोडीला कपभर चहा अशा न्याहारीनेच होते. यांना पोह्यांची इतकी सवय असते, की कुठे बाहेर फिरण्यासाठी गेलं असतानाही ही मंडळी पोह्यांच्याच शोधात अनेक हॉटेलांमध्ये जातात. त्यातही कुठेतरी हे पोहे मिळतातही पण, त्यांची चव मात्र चेहऱ्याचे हावभाव बिघडवणारी असते. परदेशात राहणाऱ्या किंवा प्रवासाला निघणाऱ्यांचीही काहीशी अशीच अवस्था. अशा सर्वच मंडळींसाठी एक कमाल मार्गही आहे माहितीये? 


कांदेपोह्यांचं प्रीमिक्स कसं बनवाल? 


- तेल कडकडीत गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि बारीक चिरलेली हिरवी मिर्ची (गरजेनुसार) टाका. फोडणी चांगली तडतडू द्या. 
- आता तेला कढीपत्ता टाकून तोसुद्धा तडतडू द्या.
- त्यानंतर तेलामध्ये शेंगदाणे टाकून ते व्यवस्थित परतून घ्या. 
- या मिश्रणात हळद मिसळा आणि दोन कप (किंवा गरजेनुसार) पोहे मिसळा. 
- चवीनुसार मीठ आणि साखर मिसळा आणि मिश्रण एकजीव करून घ्या. 
- साधारण चिवडा करतो त्याप्रमाणे प्रत्येक पोह्याला फोडणी लागेल अशा पद्धतीनं ते मिसळा आणि तीन ते चार मिनिटं मंद आचेवर ठेवा. 


हेसुद्धा पाहा : कमनीय बांधा, मादक अदा; सौंदर्याची खाण असूनही 'या' तरुणीकडे जग वेगळ्या नजरेतून का पाहतं? 


- हे मिश्रण थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात ठेवा. 
- साधारण 20 दिवसांपर्यंत कोणत्याही preservatives शिवाय तुम्ही हे मिश्रण वापरु शकता. 
- घरी अचानक पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही त्यांना दोन मिनिटांहून कमी वेळात गरमागरम पोहे खायला देऊ शकता. 
- पोहे करण्यासाठी अर्धा कप मिश्रणाला पाव कप गरम पाणी अशा प्रमाणात पाणी मिसळा आणि गरमागरम कांदेपोह्यांचा आनंद घ्या. 


(इथं कांद्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघत नसल्यामुळं आपण त्यामध्ये कांदे वापरत नाही आहोत. )