Pan Card For Minors: लहानग्यांना PAN कार्डची आवश्यकता असते! कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
PAN Card for Minors: आर्थिक व्यवहार आणि बँकिंगसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. मात्र पॅनकार्ड 18 वर्षांवरील व्यक्तींना मिळतं असं बहुतांश लोकांना वाटतं. मात्र तशी काही अट नाही. लहानग्यांचं पॅनकार्ड बनवता येतं. आयटीआर फायलिंग नियमांनुसार, भारतात आयटीआर फाईलिंगसाठी कोणतीच मर्यादा नाही.
PAN Card for Minors: आर्थिक व्यवहार आणि बँकिंगसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. मात्र पॅनकार्ड 18 वर्षांवरील व्यक्तींना मिळतं असं बहुतांश लोकांना वाटतं. मात्र तशी काही अट नाही. लहानग्यांचं पॅनकार्ड बनवता येतं. आयटीआर फायलिंग नियमांनुसार, भारतात आयटीआर फाईलिंगसाठी (ITR Filing in India) कोणतीच मर्यादा नाही. अल्पवयील प्रति महिना 15000 रुपयांपेक्षा जास्त कमवत असेल तर आयटीआर फाईल करू शकतो. आयटीआर फाईल (ITR) करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. आयकर विभागाने पॅन कार्ड मिळविण्यासाठी कोणतेही विशिष्ट वय निश्चित केलेले नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की, अल्पवयीन देखील पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. अल्पवयीन व्यक्तीचे पॅनकार्ड बनवण्यासाठी अर्ज त्याच्या पालकांच्या वतीने केला जातो.
असं काढाल अल्पवयीन मुलाचं पॅनकार्ड
पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी NSDL च्या वेबसाईटवर या. फॉर्म 49 ए भरण्यासाठी नियमावली वाचून घ्या. योग्य कॅटेगरी निवडल्यानंतर वैयक्तिक माहिती भरा. आता अल्पवयीन मुलाचा जन्म दाखला आणि आई-वडिलांच्या फोटोसह आवश्यक कागदपत्रं अपलोड करा. या दरम्यान आई-वडिलांची सही अपलोड करा. 107 रुपये फी भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. त्यानंतर एक रिसीट नंबर मिळेल. यावरून अर्जाच्या स्टेटस जाणू शकता. अर्ज केल्यानंतर एक मेल देखील येईल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत पॅनकार्ड तुमच्या घरी येईल. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने जारी केलेल्या पॅनकार्डवर त्याचा फोटो आणि स्वाक्षरी नसल्यामुळे ते ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येत नाही. जेव्हा अल्पवयीन 18 वर्षांचा होतो, तेव्हा पॅन कार्ड अपडेटसाठी अर्ज करावा लागतो.
बातमी वाचा- मॉलमधील टॉयलेटचे दरवाजे खालून उघडे का असतात? जाणून घ्या या मागचं कारण
या कागदपत्रांची आवश्यकता असते
अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांचा पत्ता आणि ओळख प्रमाणपत्र
अर्जदाराचा पत्ता आणि ओळख प्रमाणपत्र
ओळखीचा पुरावा म्हणून अल्पवयीन मुलाच्या पालकाला आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल.
पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पोस्ट ऑफिस पासबुक, मालमत्ता नोंदणीची कागदपत्रे किंवा मूळ रहिवासी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागेल.
यासाठी पॅनकार्डची असते आवश्यकता
जेव्हा मुलांच्या नावे गुंतवणूक करता.
जेव्हा एखाद्या गुंतवणुकीसाठी मुलांना वारस म्हणून नेमता.
मुलाच्या नावे बँक अकाउंट ओपन करू इच्छिता.
अल्पवयीन स्वत: पैसे कमवत असल्यास