Holi 2023 : होळी सणाचा आनंद द्विगुणित (holi2023) करतो तो म्हणजे पुरणपोळीचा बेत. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यासाठी होलिकादहनाच्या दिवशी गृहिणी सकाळपासूनच पुरणपोळीच्या तयारीला लागून असतात. परफेक्ट पुरणपोळ्या (how to make perfect puranpoli recipe in marathi ) बनवणं हे तास पाहिलं तर अवघड काम आहे. कारण पौराणपोळीसाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे पूर्ण, एकदा का पूर्ण परफेक्ट बनलं गेलं की मग पोळल्या लाटायला सोप्प जात. बऱ्याचदा आपलं पूर्ण पातळ होतं तर कधी घट्ट होऊन जातं.  (Puran Poli Making Cooking Tips) मग अशा वेळी काय करायचं ? हा प्रश्न पडतो . म्हणूनच आज खास तुमच्यासाठी होळी स्पेशल परफेक्ट पुरणपोळी बनवण्यासाठी पुरणाची तयारी कशी करायची यासाठी काही खास टिप्स.  (How To Make Perfect Puran for Puranpoli)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


(Video credit : खाद्य प्रेमी  youtube)


  •  पुरणपोळी बनवताना सर्वात आधी आपण काय करतो, चण्याची डाळ कुकरला लावतो. पण त्याआधी डाळ २ तास भिजवून ठेवा. आणि मग ती कुकरला लावा असं केल्यास डाळ पटकन शिजते. आणि मऊ देखील होते. डाळ अनेकदा आपण हरभरा डाळ घेऊन ती थेट कुकरला लावतो. मात्र त्याऐवजी ही डाळ २ तास आधी भिजत घालावी आणि मग कुकरला लावावी. ती पटकन शिजते आणि चांगली मऊ होते. डाळ शिजवताना त्यात जास्त पाणी न घालता थोडं कमी म्हणजे लागेल इतकंच घाला. 

  •  यानंतर डाळीत गूळ घालताना तो किसून घाला म्हणजे एकजीव होतो.  तसेच जास्त गूळ घालू नका यामुळे पुरण कडक होतं.

  •  सर्व व्यवस्थित करूनही जर पुरण पातळ होतं असेल तर एका सुटी कपड्यात घेऊन ते चांगलं दाबून घ्यावं म्हणजे त्यातील पाण्याचा अंश निघून जाईल. किंवा कढईमध्ये ते चांगलं परतून घ्या असं केल्यानेसुद्धा अधिकच पाणी निघून जाईल. 

  •  कुकरमध्ये किंवा टोपात डाळ शिजवताना त्यात चमचाभर तूप घाला. म्हणजे डाळ खाली चिकटच नाही आणि मऊसुद्धा होते. गुळासोबत साखर घातल्याने पुरण चवीला छान गोड होतं. एक मात्र लक्षात ठेवा पुरण परतत असताना ते सतत ढवळत राहा म्हणजे पुरणपोळी खमंग लागते.  

  •  पुरण परतून झाल्यावर साधारण रूम टेम्परेचरला आल्यावर लगेच बारीक करून घ्या. कारण पुरण थंड झाल्यावर ते कडक होऊ लागत आणि कडक पुरणाच्या पोळ्या फाटतात आणि चिवट होतात. 

  •  तसंच पुरण घट्ट किंवा कडक आहे असं वाटलं तर त्याला थोडा दुधाचा शिपका द्यायचा म्हणजे ते नरम होण्यास मदत होते.