Kitchen tips and tricks: कोणतीही भाजी बनवायची असेल तर ग्रेव्हीसाठी टोमॅटो हवंच असतं, टोमॅटोचा वापर ग्रेव्ही बनवण्यासाठी केला जातो. टोमॅटोला तर किचनमधील सर्व भाज्यांमध्ये  किंग म्हटलं जातं. आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा टोमॅटोचं महत्व जास्त (Health benefits of tomato) आहे.लालेलाल टोमॅटोमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिनची मात्रा भरपूर प्रमाणात असते. बाराही महिने कांदा,टोमॅटो,बटाटे किचनमध्ये उपलब्ध असतात. (cooking tips)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता भाज्या म्हटल्या की, बाजारात त्यांचे भाव कमी जास्त होताच राहतात. कधी टोमॅटोची आवक कमी झाली की ते महाग विकले जातात.आपणसुद्धा जेवणात दोनऐवजी एक टोमॅटो घालतो. पण कधीकधी अचानक आवक वाढते आणि बाजारात टोमॅटो भरपूर स्वस्त (tomato price in market) प्रमाणात मिळून जातात. मग आपण काय करतो जास्त टोमॅटो आणतो आणि फ्रीझमध्ये साठवून ठेवतो. (cooking tips) पण कालांतराने ते साठवलेले टोमॅटोसुद्धा खराब होतात. 


यावर एक उत्तम पर्याय आहे तो वापरून तुम्ही वर्षभर पुरेल इतके टोमॅटो साठवू शकता आणि मुखतः वर्षभरासाठी साठवून देखील ठेऊ शकता.(How To Make Tomato Powder At Home).


तर जे वाचलंत ते ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल ना, एरव्ही 4 दिवसात टोमॅटो खराब होऊन जातात ते वर्षभर कसे टिकवता येतील ?. तर इथे तुम्हाला टोमॅटो नाही तर त्यापासून बनवलेली पावडर वर्षभर पुरवता येणार आहे. आणि मग ती हवी तेव्हा हवी तशी वापरता येऊ शकणार आहे. आहे की नाही भन्नाट आयडिया. (cooking tips in marathi)


चला तर मग जाणून घेऊया टोमॅटो स्टोअर करण्यापेक्षा टोमॅटोची पावडर कशी बनवायची... (Cooking tips How To Make Tomato Powder At Home).



(Video Credit- seemassmartkitchen)


बाजारातील प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले,पाकीट बंद पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घारीबांवलेले अगदी उत्तम आणि पौष्टिक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय केलीच पाहिजे.


कृती 


  • एकदम 2-3 किलो टोमॅटो आणा आणि ते स्वच्छ धुवून घ्या. 

  • आता या टोमॅटोचे बारीक पातळ काप करून घ्या.

  • टोमॅटो व्यवस्थित वाळवून घ्या, देठाकडील भाग काढून घ्या

  • हे काप मोठ्या थाळीमध्ये पसरवून घ्या.

  • या थाळीवर एक मसलीन किंवा कॉटनचा कपडा बांधून घ्या. 

  • आता ही थाळी पुढचे 5-6 दिवस उन्हात ठेऊन द्या.

  • मध्ये मध्ये तपासून घ्या की, कापलेल्या टोमॅटोच्या चकत्यांमधून पाणी पूर्णतः निघून जाईल. 

  • या वाळलेल्या चकत्या मिक्सरमधून बारीक करून घ्या, 

  • टोमॅटोची पावडर काचेच्या हवाबंद डब्ब्यात भर आणि झाकण अगदी घट्ट लावा. 

  • वर्षभर पुरेल अशी टोमॅटो पावडर बनून तयार. ही पावडर भाजी,डाळ, कोशिंबीर, सूपमध्ये वापरू शकता.