मुंबई : आजच्या काळात Whatsappचा  वापर प्रत्येक जण करतो. आतापर्यंत आपण व्हॅट्सअपच्या माध्यमातून फक्त एकमेकांशी ऑनलाईन संवाद साधत होतो. पण आता व्हॅट्सअप युजर्ससाठी डिजिटल पेमेंट सेवा सुरू केली आहे. ही सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बँक खत्याला जोडावा लागेल. त्यानंतर प्रथम बँक खाते जोडल्यानंतर यूपीआय पिन सेट करावा लागणार आहे. जर तुमच्याकडे आधीपासून यूपीआय पासकोड असल्यास तुम्ही तो कोड वापरू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे व्हॅट्सअपने आपल्या 400 कोटी युजर्सपैकी दोन कोटी युजर्सला या खास सेवेचा फायदा घेता येणार आहे. व्हॅट्सअपच्या माध्यमातून तुम्ही इतर ऍप्सवर दोखील पैसे पाठवू शकता. संबंधीत युजरने व्हॅट्सअपवर नोंदणी केली नसली तरीही पैसे ट्रान्सफर होवू शकातात. 



त्यासाठी 'enter UPI ID'चा पर्याय  दिला आहे. त्याचप्रमाणे इतर ऍपदेखील व्हॅट्सअपवर पैसे पाठवू शकतात. यूपीआय प्रमाणेच व्हॅट्सअपवर देखील एक लाख रूपये व्यवहाराची मर्यादा असणार आहे. व्हॅट्सअपच्या माध्यामातून व्यवहार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. ही सुविधा फक्त भारतीय खात्यासह जोडली जाणार आहे.