कोरोना संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नियमित सुयोग्य आहार गरजेचा आहे. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली रहावी. न्युट्रिशन आणि हायड्रेशनमुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.  WHO ने कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणत्या अन्नपदार्थांचं सेवन करावं आणि कोणत्या नाही याबाबत सांगितलं आहे.


प्रोसेस्ड फूडपासून दूर रहा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, फ्राइड फूड, फ्रोजन पिज्जा सारख्या अन्नपदार्थापासून लांब राहवं. कोणत्याही प्रकारच्या इतर आजारांमुळे कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यत वाढते. स्थुलता, हृदयविकार, स्ट्रोक, डायबिटीज आणि काही प्रकारचे कॅंन्सर दूर ठेवण्यासाठी साखर आणि मिठ जास्त खाऊ नये.


डाइटमध्ये या गोष्टींचा सामावेश करा


आपल्या डाइटमध्ये ताजे फळ आणि अनप्रोसेस्ड अन्नाचा सामावेश करा. याने तुमच्या शरिराला विटामिन, मिनरल्स, फायबर प्रोटिन्स आणि अॅंटी ऑक्सिडेंट मिळेल. जेवनात फळ, भाजीपाला, दाळ बीन्सचा सामावेश करा. 
मक्का, बाजरी, गहू, मोड आलेले पदार्थ, बटाटे आदींचे सेवन करा. प्रोसेस्ड नॉनवेजचे सेवन टाळावे


रेस्टॉंरंटपासून दूर रहा


कोरोना एकदुसऱ्यांच्या संपर्कात आल्याने जास्त वाढतो. त्यामुळे बाहेरील खाने टाळावे


8 ते 10 ग्लास पानी प्या


पाणी शरिरातील तापमान नियंत्रित ठेवते.  दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. सोबतच फळांचे - भाज्यांचे ज्युस आणि लिंबू पाणी पिणे फायद्याचे ठरते. कोल्डड्रिंक, सोडा आणि कॉफी शक्यतो टाळा.


मानसिक आरोग्य जपा


कोरोना काळात कोरोना झालेल्या आणि कोरोना न झालेल्या सर्वांनी आपले मानसिक आरोग्य जपले पाहिजे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसाल तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क करा.