Winter Tips: हिवाळ्यात लहान मुलांच्या ड्राय स्किनची अशी घ्या काळजी..घरगुती उपायांनी दूर होईल समस्या
हिवाळ्यात मुलांची त्वचा खूप कोरडी (Winter tips) होते. कोरडेपणामुळे त्यांच्या त्वचेवर अॅलर्जी (Skin care)आणि पुरळ उठतात, त्यामुळे मुलांना त्वचेला खाज उठते आणि लहान मूलं मग चिडचिड करू लागतात.
winter care : देशाच्या (Cold wave in northern india) उत्तर भागात थंडीनं चांगलाच जम बसवल्याचं पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश (hindustan times), उत्तराखंड (Uttarakhand) आणि जम्मू काश्मीरच्या (Jammu kashmir) बहुतांश भागांमध्ये बोचरी थंडी जाणवू लागली असून, काही भागांमध्ये हिमवृष्टीलाही सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये आलेल्या या थंडीच्या लाटेचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत.
पुणे (Pune) , सातारा (satara) या भागांमध्ये तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai) भागातही रात्रीच्या तापमानात (Temprature drops down) घट झाल्याचं स्पष्टपणे लक्षात येतंय. (winter in Maharashtra to experience Cold wave as mercury drops down)
हिवाळा जवळ येतोय वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. थंडीचा सर्वात जास्त आणि लवकर परिणाम होतो तो आपल्या स्किनवर. आणि लहान मुलांची स्किन तर आपल्या पेक्षा नाजूक असते, त्यांच्या त्वचेची काळजी घेणं खूप महत्वाचं असत. (How to take care of baby dry skin this winter apply home tips )
हिवाळ्यात मुलांची त्वचा खूप कोरडी (Winter tips) होते. कोरडेपणामुळे त्यांच्या त्वचेवर अॅलर्जी (Skin care)आणि पुरळ उठतात, त्यामुळे मुलांना त्वचेला खाज उठते आणि लहान मूलं मग चिडचिड करू लागतात. तर घरच्या घरी अगदी सोप्या उपायांनी ड्राय स्किन कशी ठीक करता येईल चला पाहूया..
खोबरेल तेल (coconut oil)
खोबरेल तेल घरच्या घरी सहज उपलब्ध असत. खोबरेल तेलामध्ये इमोलियंट गुणधर्म असतात. इमोलियंट्स (emolients ) त्वचेच्या पेशींमधील ड्रायनेस कमी करण्याचं काम करतो. आणि त्वचा मऊ आणि चमकदार बनते.
ग्लिसरीन आणि गुलाबजल (glycerin and rose water)
लहान मुलांच्या गालांची स्किन खूप कोरडी पडून भाजल्यासारखी दिसत असेल तर त्यांच्या गालावर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी एकत्र करून ते मिश्रण लावू शकता. हे लावल्यानंतर त्यावर तुम्ही मॉइस्चरायझर लावू शकता.
ओटमील बाथ (oatmeal bath)
ड्राय स्किनसाठी ओटमील एक सोपा घरगुती उपाय आहे. ओटमीलमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे स्किनला होणाऱ्या खाजेपासून दूर ठेवतात. अंघोळ करताना पाण्यात एक थेंब ओटमील ऑइल टाकल्याने त्वचेला फायदा होतो.
कडुलिंबाचे तेल (neem oil)
हिवाळ्यात लहान मुलांचे गाल ड्राय होतात. यावेळी कडुनिंबाचं तेल फार गुणकारी आहे. कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मअसतात. जे लहान मुलांच्या नाजूक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.