How to took entire indian railway train : तुम्ही रेल्वेप्रवास एकदातरी केलाच असेल. लांब पल्ल्याच्या या प्रवासात तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या का? या प्रवास अनेक मंडळी त्यांच्या कुटुंबाचा लवाजमा सोबत घेऊन येतात. अशा वेळी एकाहून अधिक सीट ही मंडळी आरक्षित करतात. कारण, एकत्र प्रवास करण्याची मजाच काही और. अशा या एकत्र प्रवासामध्ये जास्तीत जास्त 50, 60 सीटचं एकत्र आरक्षण केलं जातं. पण, तुम्ही कधी संपूर्ण ट्रेनच आरक्षित केल्याचं पाहिलंय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दचकू नका हे शक्य आहे. किंबहुना काही चित्रपटांमध्ये तुम्ही हे पाहिलंसुद्धा असेल. भारतीय रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांअंतर्गत तुम्ही संपूर्ण रेल्वेगाडीतील Ticket घेऊ शकता. यासाठी किती पैसे भरावे लागतात माहितीये? 


चार्टर्ड ट्रेन किंवा संपूर्ण कोचची ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी आयआरसीटीसीच्या एफटीआर  (IRCTC FTR Website)संकेतस्थळाची मदत होते. सर्व रेल्वे स्थानकांवरून प्रवास करण्याची सुविधा या ट्रेनमध्ये मिळते. पण, चार्टर्ड कोच तिथंच लावला जातो जिथं ही ट्रेन 10 मिनिटांहून अधिक काळासाठी थांबते. प्रवासाच्या तारखेपासून 6 महिन्यांपासून प्रवासाच्या 30 दिवस आधीपर्यंत तुम्ही हे आरक्षण करु शकता.  Technical Feasibility च्या बळावर तुम्ही एका ट्रेनमध्ये एफटीआरवर जास्तीत जास्त 2 कोच बुक करू शकता. याशिवाय सर्व 24 कोच बुकींगचीही सुविधा तुम्हाला मिळते. एफटीार कोचमध्ये ही संख्या किमान 18 कोच इतकी असते. 


हेसुद्धा वाचा : अर्ध्याहून अधिक मुंबई रिकामी होणार? 60 टक्के मुंबईकर शहर सोडणार कारण...


आकारली जाणारी रक्कम 


प्रति कोच 50000 रुपयांच्या नोंदणी रकमेसह तुम्हाला ऑनलाईन अर्जामध्ये बुकींगचा प्रकार, प्रवासाची माहिती, मार्ग आणि इतर माहिती द्यावी लागते. इथं 18 कोचसाठीची नोंदणीची रक्कम 9 लाखांच्या घरात जाते. 


रेल्वेगाडी बुक करण्याची प्रक्रिया 


  • सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या www.ftr.irctc.co.in या संकेतस्थळावर भेट द्या. 

  • आता तिथं युजर आयटी आणि पासवर्ड देऊन लॉगईन करा. युजर आयडी नसल्यास तो तयार करा. 

  • पूर्ण कोच बुक करायचा असल्यास एफटीआर पर्याय निवडा. 

  • इथं तुम्हाला सर्व माहितीची पूर्तता करावी लागणार आहे. 

  • आता अखेर देय रक्कम भरून प्रक्रिया पूर्ण करा.