Loan Transfer | एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करण्याची जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
Bank Loan Transfer | जर तुम्हाला तुमच्या बँकेचे कर्ज महाग पडत असेल तर, किंवा तुम्ही तुमच्या बँकेच्या सेवेबाबत असमाधानी असाल तर तुम्ही कर्ज इतर बँकेत ट्रान्सफर करू शकता.
Bank Loan Transfer: भारतीय रिझर्व्ह बँकने नुकतीच रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर आता कर्जाच्या दरात देखील वाढ होणार आहे. दर तुम्हाला तुमच्या बँकेचे कर्ज महाग होत असेल, तर तुम्ही ते कर्ज इतर बँकेत ट्रान्सफर करू शकता. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.
कर्ज कसे ट्रान्सफर करावे
कर्ज ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला कोणत्याही नवीन बँकेची निवड करावी लागेल. नवीन निवड करीत असलेल्या बँकेत तुम्हाला कर्जाचे कमी व्याज भरावे लागणार असेल तर तु्मच्यासाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो.
कर्ज ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या बँकेकडून फोरक्लोजरचा अर्ज द्यावा लागेल. तसेच जुन्या बँकेकडून अकाऊंट स्टेटमेंट आणि प्रॉपर्टीचे कागदपत्र घ्यावे लागतात. यानंतर सर्व कागदपत्र नवीन बँकेत जमा करायचे असतात.
जुनी बँकेकडून NOC
नवीन बँकेत हस्तांतरित करण्यापूर्वी जुनी बँक तुम्हाला एनओसी किंवा ना हरकत प्रमाणपत्र देईल. त्यासाठी संमतीपत्रही घेता येईल. हे पत्र नवीन बँकेत जमा करावे लागेल. सर्व कागदपत्रे नवीन बँकेला द्यावी लागतील. नवीन बँकेत कर्ज हस्तांतरित करण्यासाठी, तुम्हाला 1 टक्के प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
आवश्यक कागदपत्रे
केवायसी
मालमत्तेचे कागदपत्र
शिल्लक कर्ज
व्याजाचे प्रमाणपत्र/ कागदपत्र
ट्रान्सफर अर्ज
जुन्या बँकेकडून संमती पत्र
ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नवीन बँक तुमच्या जुन्या बँकेकडून संमतीपत्र घेईल आणि त्या आधारावर कर्ज बंद केले जाईल. नवीन बँकेशी करार करावा लागेल. बँकेचे थकीत शुल्क भरल्यानतर तुमच्या नवीन बँकेतून EMI सुरू होईल.