जुन्या कंपनीची PF रक्कम नवीन खात्यात कशी ट्रान्सफर करायची? जाणून घ्या सविस्तर
अनेकदा कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरी बदलताना त्यांची पीएफ शिल्लक ट्रान्सफर करायला विसरतात. नंतर ट्रान्सफर करण्यात कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते.
नवी दिल्ली : अनेकदा कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरी बदलताना त्यांची पीएफ शिल्लक ट्रान्सफर करायला विसरतात. नंतर ट्रान्सफर करण्यात कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते.
तुम्ही 1, 2, 3 किंवा अगदी 4 कंपन्या बदलल्या असल्या तरीही तुम्ही जुन्या कंपनीतील EPF शिल्लक तुमच्या आताच्या कंपनीच्या PF खात्यात ट्रान्सफर करू शकता. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. जी तुम्ही घरी बसूनही आरामात करू शकता. ईपीएफओने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
पीएफ ट्रान्सफर करण्यापूर्वी महत्त्वाची माहिती
तुमची जुनी ईपीएफ शिल्लक नवीन खात्यात हस्तांतरित करण्यासाठी, प्रथम तुमच्याकडे ऍक्टिव UAN क्रमांक आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे. तुमच्या UAN वर बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक अपडेट असणे महत्वाचे आहे.
जुन्या पीएफ खात्यातील शिल्लक कशी तपासायची
1. तुमची जुनी PF शिल्लक नवीन PF खात्यात हस्तांतरित करण्यासाठी, तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ला भेट द्यावी.
2. यानंतर तुम्हाला UAN नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करावे
3. लॉग इन केल्यानंतर, तुम्ही होम पेजवर याल. येथे तुम्हाला सदस्यांच्या प्रोफाइलवर जावे लागेल. जिथे तुम्हाला तुमचे सर्व वैयक्तिक तपशील तपासावे लागतील. तुमचे नाव, आधार तपशील, पॅन कार्ड पडताळले पाहिजे. याशिवाय ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचे तपशीलही अचूक भरावेत.
4. पीएफ ट्रान्सफर करण्यापूर्वी तुम्ही तुमचे पासबुक तपासले पाहिजे. यासाठी तुम्हाला व्ह्यूमध्ये जावे लागेल जिथे पासबुकचा पर्याय दिसेल.
5. पासबुकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉगिन करावे
6. लॉगिन केल्यानंतर, तुम्ही निवडलेल्या एम्प्लॉय आयडीवर क्लिक करताच, एक संपूर्ण यादी उघडेल. तुम्ही काम केलेल्या सर्व कंपन्यांचे एम्प्लॉय आयडी दिसतील. सर्वात खाली असलेला आयडी तुमच्या सध्याच्या कंपनीचा आहे.
येथे तुम्ही पासबुक बघून तुमच्या सर्व कंपन्यांमधील पीएफ शिल्लक तपासू शकता.