How to change name and age in train ticket: रेल्वेने प्रवास करायचा म्हटलं तर बुकिंग फूल होत असल्याने अनेकदा दोन ते तीन महिने आधीच तिकीट बूक केली जाते. ऐनवेळी गैरसोय होऊ नये यासाठी प्रवासी आधीच तिकीट बूक करुन ठेवत असतात. पण काहीवेळा प्रवास रद्द करावा लागतो. दरम्यान तिकीट रद्द केली तर वेळेनुसार त्यातील रक्कम वजा करत रिफंड दिला जातो. पण काहीवेळा आपल्या जागी दुसऱ्या व्यक्तीला प्रवासाला पाठवायचं असतं. अशावेळी त्याची तिकीट नसल्याने कसं पाठवायचं अशी समस्या निर्माण होते. पण तुम्हाला माहिती आहे का, रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी तिकीट ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेचा कसा वापर करायचा हे समजून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना अनेक सुविधा देत असते. पण प्रत्येक सुविधेबद्दल प्रवासी जागरुक नसतात. त्यामुळे काही वेळेला प्रवाशांच्या वेळेचं आणि आर्थिक नुकसान होतं. असाच एक नियम आहे ज्यामध्ये तुम्ही तिकीट ट्रान्सफर करु शकता. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या नावे असणारं तिकीट दुसऱ्याच्या नावे करु शकता. रेल्वे तुम्हाला ही तिकीट ट्रान्सफरची सुविधा देतं. म्हणजेच तुम्ही दुसऱ्याच्या कंफर्म तिकीटावर सहज प्रवास करु शकता. रेल्वेने ट्वीट करत हे कसं करु शकता याची सविस्तर माहिती दिली आहे. 


रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी आपल्या कुटुंबातील सदस्याच्या नावे तिकीट ट्रान्सफर करु शकतात. जर तुमच्याकडे कंफर्म तिकीट असेल आणि काही कारणास्तव तुम्ही प्रवास करु शकत नसाल, तर तुम्ही हे तिकीट तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे करु शकता 


तिकीटवरील नाव कसं बदलायचं?


तुम्ही तिकीट खिडकीवरुन काढली असेल किंवा ऑनलाइन बुकिंग केलं असलं तरी तुम्हाला नाव बदलण्यासाठी काऊंटरवर जावं लागेल. यासाठी तुम्हाला तिकिटाची प्रिंट आऊट काढावी लागेल आणि ज्याच्या नावे तिकीट ट्रान्सफर करायचं आहे त्याचं ओरिजिनल आयडी एका झेरॉक्ससह काऊंटवर न्यावं लागले. यानंतर तुम्ही ऑनलाइन बुकिंग किंवा खिडकीवरुन काढलेल्या तिकीटावरील नाव बदलू शकता. 


वेटिंग किंवा RAC वर मिळणार नाही सुविधा


IRCTC ने आपल्या प्रवाशांना ही नाव बदलण्याची सुविधा दिली आहे. पण हा बदल तिकीटावर एकदाच केला जाऊ शकतो. त्यातही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, तुमचं तिकीट कंफर्म असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तुमचं तिकीट वेटिंग किंवा RAC असेल तर तुम्ही हे तिकीट ट्रान्सफर करु शकत नाही.