नवी दिल्ली : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)ने येणाऱ्या वर्षात देशभरात ५०० नवे पेट्रोलपंप उघडण्याची घोषणा केली आहे. बुधवारी HPCL ने जानेवारी- मार्च तिमाहीच्या कंपनी रिझल्टची घोषणा केली. या दरम्यान HPCL कार्यकारी संचालक एम.के सुराना यांनी कंपनीच्या एक्सपेंशन प्लानची घोषणा केली. २०१७-१८ या आर्थिक वर्षात HPCL ने ६६९ नव्या पेट्रोलपंपांना मंजुरी दिली. सध्या देशामध्ये HPCL चे १५ हजार ०६२ रिटेल आऊटलेट आहेत. आता येणाऱ्या २०१८-१९ वर्षात ५०० आऊटलेट खोलण्याची गरज असल्याचे सुराना यांनी सांगितले. 


कोण उघडू शकत पेट्रोल पंप ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पेट्रोल पंपाचा मालक बनण्यासाठी तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणं गरजेच आहे. यासोबतच आपल वय २१ ते ५५ वर्षांपर्यंत असावंं. आपल शिक्षण किमान १० वी पास असावं. 


जागा आहे का ?


पेट्रोलपंप उघडण्यासाठी तुमच्याकडे जागा असणं गरजेच आहे. स्वत:ची नसेल तरीही जमिन मालकाकडुन NOC घ्यावी लागेल. 
तुमच्या परिवारातील कोणत्याही सदस्याच्या जमिनीवर पेट्रोल पंपासाठी अर्ज करु शकता. तरीही NOC आणि Affidait बनवाव लागेल. 
जमिन लीजवर असल्यास तसा करार असण गरजेच आहे. यासोबतच  Registered sales deed किंवा lease deed असण गरजेच आहे. 
जमिन ग्रीन बेल्टमध्ये नसावी. 
शेती भागात जमिन येत असल्यास त्याच रुपांतर करुन गैर कृषी भागात आणाव लागेल. 
तुमच्याकडे जमिनीचे संपूर्ण कागदपत्र आणि नकाशा असावा.


किती येईल खर्च ? 


पेट्रोल पंप उघडण्यासाठी खर्च पेट्रोलियम कंपनीवर ठरतो. देशात ग्रामीण आणि शहरी अशा २ प्रकारचे पेट्रोलपंप असतात. त्यामुळे याचा खर्चही वेगवेगळा असतो. प्रॉपर्टीचा खर्च वगळल्यास ग्रामीण भागात पेट्रोलपंप उघडण्याला १२ लाखापर्यंत खर्च आहे. शहरी भागात यासाठी २५ लाखापर्यंत खर्च येईल. तरीही जागेनुसार या किंमतीत चढउतार होऊ शकतो.