नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालय (एचआरडी) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. ज्या परीक्षा आधीच झाल्या आहेत त्यांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया सुरु करा. तसेच केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाला उत्तर पत्रिका तपासण्यासाठी मदत केली जावी असे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या २९ विषयांची परीक्षा घेण्याविषयीची बोर्डाची भूमिका बदलली नाही. परीक्षा घेतली जाईल असे सीबीएसई (CBSE) चे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्याम भारद्वाज यांनी सांगितले. 



परीक्षा आयोजनासंदर्भात प्रश्न उपस्थित होत असताना सीबीएसई अधिकाऱ्यांचा हा खुलासा आला आहे. आम्ही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा घेण्यास तयार आहोत. कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलली आहे.


लॉकडाऊननंतर २९ विषयांची परीक्षा शक्य होईल तितक्या लवकर होईल असे सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


मुलांना पुढच्या वर्गात जाण्यासाठी तसेच पदवी मिळण्यासाठी ही परीक्षा महत्वपूर्ण आहे.


किमान दहा दिवसआधी विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल कळवले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले.