नवी दिल्ली : देशाच्या नागरिकांना पुन्हा एकदा सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. तेल कंपन्यांनी 94 रुपये विनाअनुदानीत आणि 4 रुपये 56 पैसे अनुदानीत सिलेंडरमागे वाढवले आहेत. चार महिन्यांपासून गॅस सिलेंडरवर दर दरमहा चार रुपयांनी वाढ होत होती. परंतु मध्यरात्री पासून 93.50 रुपयांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरची किंमत 751 रुपये 
झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून नवीन दर लागू


वाढत्या किंमतींचा परिणाम निम्न आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर होईल. 93 रुपयांची मोठी वाढ पहिल्यांदाच झाली आहे. नवीन दरांनुसार, आता 14.2 किग्रॅ विना-अनुदानित गॅस सिलिंडर 743 रुपयांना तर मुंबईत 718 रुपयांना मिळणार आहे. 19 किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत 1268 रुपये आहे. अनुदानित सिलिंडर 491.13 रुपयांवरून वाढून 495.69 रुपये झाली आहे. वाढीव दर 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहेत.