नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार हुकुम सिंह यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. नोएडा येथील रूग्णालयात त्यांनी शनिवारी (३ फेब्रुवारी) अखेरचा श्वास घेतला. कैराना मतदारसंघातून ते लोकसभेवर प्रतिनिधित्त्व करत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हुकुम सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 'खासदार आणि उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते हुकुम यादव यांच्या निधनामुळे मी प्रचंड दु:खी झालो आहे. त्यांनी आयुष्यभर उत्तर प्रदेशच्या लोकांची सेवा केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या निधनामुळे मी दु:ख व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर हुकुम सिंह यांच्या आत्म्याला शांती देवो, अशी भावना मोदींनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही हुकुम सिंह यांच्या निधनावर दु: व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशमधून हुकुम सिंह यांनी लोकसभेवर सात वेळा प्रतिनिधित्व केले.२०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले ते पहिले खासदार होते. त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसला असल्याची भावना शहा यांनी व्यक्त केली आहे.