Hurun Rich List : इच्छा असेल तर मार्ग ही निघतो. मग कोणतेच अडथळे तुम्हाला थांबवू शकत नाहीत. आठ तासांच्या नोकरीच्या चक्रात न अडकता एका तरुणाने असाच वेगळा विचार केला आणि आज या तरुणाने देशातील सर्वात तरुण अरबपती व्यावसायिक होण्याचा मान मिळवला आहे. हुरुन रिच लिस्टने देशातील अरबपतींची यादी जाहीर केली आहे. यात कैव्य बोहरा या अवघ्या 21 वर्षांच्या उद्योगपतीचा समावेश करण्यात आला आहे. कैवल्यची एकूण संपत्ती 3600 कोटी रुपये इतकी आहे. कॉलेज ड्रॉपआऊट ते Yongest Bollionaire ही कैवल्यची कहाणी देशातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबपती यादीत 300 उद्योगपती
हुरुन इंडिया रिच लिस्‍ट (Hurun India Rich List) मध्ये पहिल्यांदाच भारतातील 300 हून अधिक अरबपतींचा समावेश झाला आहे. या पहिल्या स्थानावर अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांचं नाव आहे. तर रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सर्वात युवा अरबपती (India Richest Billionaire) म्हणून डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झेप्टोचे (Zepto) सह-संस्थापक कैवल्य बोहरा यांनी मान मिळवला आहे. 


सलग तिसऱ्यांदा श्रीमंताच्या यादीत समावेश
Zepto चा व्यवसाय मुंबईसह बंगळुरु, लखनऊ, दिल्ली आणि चेन्नई या प्रमुख शहरात विस्तारला आहे. व्यवसाय वाढीबरोबरच शेअर मार्केटमध्येही झेप्टोने मोठी झेप घेतली आहे. झेप्टो कंपनीचं आताचं बाजारमूल्य 5 अरब डॉलर इतकं आहे. 2022 मध्ये अवघ्या 19 वर्षांच्या कैवल्य वोहराने IIFL Wealth-Hurun India Rich List 2022 मध्ये एन्ट्री केली. त्यानंतर सलग तिसऱ्या वर्षी कैवल्याचा युवा अरबपतीच्या यादीत समावेश होतोय. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप्टोचाच दुसरा सह-संस्थापक आदित्या पालीचा याचा नंबर लागतो. आदित्यही अवघ्या 22 वर्षांचा आहे. 


21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती
झेप्टो ही भारतातील किराणा सामनाची घरपोच डिलिव्हरी करणारी कंपनी आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन किराणा सामान, फळं, भाज्या, इलेक्ट्रॉनिक्स सामन आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू मागवल्या जातात. अवघ्या 10 मिनिटात सामान घरपोच ही झेप्टोची खासियत आहे. Hurun India Rich List मध्ये असलेला झेप्टोचा सह-संस्थापक कैवल्य हा केवळ 21 वर्षांचा असून त्यांची एकूण संपत्ती 3600 कोटी रुपये इतकी आहे. कैवल्य आणि त्याच्या मित्राने या स्टार्टअपची सुरुवात केली.


कॉलेजमध्ये शिकत असताना घेतला निर्णय
कैवल्य वोहराचा जन्म 2003 मध्ये बंगळुरुमध्ये झाला. शालेय शिक्षण त्याने मुंबईत पूर्ण केलं. तर महाविद्यालयीन शिक्षण त्याने दुबईत पूर्ण केलं. त्यानंतर त्याने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत कॉम्प्यूटर सायन्समधून पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला. चांगलं शिक्षण घेत चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं ध्येय कैवल्य ठेवलं होतं. पण कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच्या डोक्यात वेगळीच कल्पना आली. याच कल्पनेवर त्याने व्यवसाय सुरु करण्याचं निश्चित केलं. 2020 मध्ये 17 वर्षांचा असताना कैवल्यने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयात त्याला मित्र आदित्य पालिचाने मदत केली.



दोन मित्रांच्या यशाची कहाणी
कैवल्य आणि आदित्यने आपल्या स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी 2018 मध्ये GoPool नावाची विद्यार्थ्यांसाठी कार सर्व्हिंस सुरु केली. पण शिक्षण आणि व्यवसाय सांभाळणं कठिण होऊ लागलं. त्यामुळे त्यांनी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर कैवल्य आणि आदित्यने 2020 मध्ये ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी स्टार्टअप किरानामार्ट सुरु केलं. पण याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय बंद केला. पण ते शांत बसले नाहीत त्यांनी नव्या कल्पनेसह नवी सुरुवात करण्याचं ठरवलं.


10 मिनिटात डिलिव्हरीची कल्पना
ग्राहकाने किराणा सामान ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर सामान ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ लागत होता. त्यामुळे ग्राहक नाखुश होत होते. यावर तोडगा काढत त्यांनी ऑर्डर केल्यानंतर त्याच दिवशी सामान पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आणि यातूनच झेप्टोचा जन्म झाला. कोरोना काळात झेप्टोने लोकांना घरपोच सामान देण्याची सेवा सुरु केली. कोरोना काळात लोकं घराबाहेर पडत नसल्याने त्यांच्या ऑनलाईन डिलिव्हरीच मागणी प्रचंड वाढली. यानंतर त्यांनी अवघ्या 10 मिनिटात सामान घरपोच पोहोचण्यास सुरुवात केली. आज हीच 10 मिनिटं कैवल्य आणि आदित्यच्या यशाचं मार्ग बनली आहेत.