Bihar News:  पती-पत्नीचं नातं हे अतूट नातं मानले जाते.  लग्नात सप्तपदी घेताना आयुष्यभर एकमेकांची साथ देणार असे वचन पती-पत्नी एकमेकांना देतात. हे वचन खरं ठरवणारी घटना बिहारमध्ये घडली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतरही पतीने तिला साथ दिली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच पतीने देखील प्राण सोडले. या पती-पत्नीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील रोहतास जिल्ह्यात ही  हृदयद्रावक घटना घडलेय. एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. पतील पत्नीच्या मृत्येचे वृत्त समजताच पतीनेही प्राण सोडले. पत्नी पत्नीचा अघ्या तासाच्या अंतराने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.  कारघर ब्लॉकमधील इटिमहन गावात ही मन सुन्न करणारी घटना घडलेय. 60 वर्षीय तेत्री देवी दीर्घकाळापासून आजारी होत्या. बुधवारी त्यांचे निधन झाले. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे पती गंगा सिंग ( वय 65 वर्षे) यांचाही मृत्यू झाला.अवघ्या काही तासांतच दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरातील सर्वच जण अचंबित झाले आहेत. 


पत्नीच्या अत्यंस्काराची तयारी सुरु असताना पतीचा मृत्यू


या मृत दाम्पत्याच्या मुलीने यांच्या निधनाची माहिती दिली. आई  तेत्री देवी मागील काही दिवसांपासून आजारी होती. आई आजारी पडल्यानंतर वडिल देखील आजारी झाले होते. त्यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु होते. आईचा उपचारादम्यान मृत्यू झाला.  आईच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच वडिलांचे देखील निधन झासे. आईच्या जाण्याचे दु:ख वडिलांना सहन झाले नाही. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी देखील प्राण सोडले. यानंतर आई आणि वडिलांवर एकत्रच अत्यंसंस्कार करण्यात आल्याचे या मुलीने सांगितले. 


पत्नीला वाचताना पतीचा मृत्यू


सांगली जिल्ह्यात भाटशिरगावमध्ये पती-पत्नीचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला होता. पत्नीला वाचताना पतीचा बुडून मृत्यू झाला. 57 वर्षीय अर्जुन देसाई यांचं पाझर तलावाजवळ घर आहे. बुधवारी दुपारी पत्नी सुमन तलावात बुडताना दिसल्या, म्हणून अर्जुन यांनी धाव घेतली. तेही बुडाले आणि दोघांचाही मृत्यू झाला. सात वर्षाच्या नातवासमोर हा सगळा प्रकार घडला. संध्याकाळी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.