Husband Wife Viral Video: पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. पती रात्रभर तिला शोधत राहिला. अचानक पत्नी आणि तिचा प्रियकर समोर येताच पतीने केले असं काही की सगळेच हैराण झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस कस्बेमध्ये ही घटना घडली आहे. पती-पत्नी और वो यांच्यातील हा ड्रामा पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी दुपारी महिलेचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी आला होता. तेव्हा ते मोबाइलच्या सिमची अदलाबदली करत होते. त्याचवेळी महिलेच्या मुलाने त्यांना बघितले. त्यानंतर संध्याकाळी पत्नी घरी आल्यानंतर मुलाने घटलेली सगळी घटना सांगितली. पत्नीच्या प्रेमसंबंधाबाबत कळताच पतीने तिला जाब विचारला. त्यावर तिने वाद घालण्यास सुरुवात केली. 


मार्च महिन्यापासून एका युवकासोबत तिचे संबंध होते. तसंच त्याने तिला फोनदेखील दिला होता. त्यावरुन दोघही रोज बोलत होते, अशी माहिती पतीला कळाली. त्यावर रागात त्याने पत्नीसोबत झालेल्या भांडणात तिच्यावर हात उगारला आणि घरातून निघून गेला. याचदरम्यान पत्नीदेखील मुलांना घरातच सोडून प्रियकरासोबत पळून गेली. पत्नी पळून गेल्याचे कळताच तो चिंतेत पडला.


घरी जाताच त्याने संपूर्ण घर धुंडाळले पण ती कुठेच दिसली नाही. रात्रभर तो गावात पत्नीचा शोध घेत फिरत होता. त्यानंतर तो पत्नीच्या माहेरीदेखील गेला. मात्र ती तिथेही नव्हती. त्याचवेळी तो बँकेत पोहोचला तिथे महिलेचा प्रियकर दिसला. त्याला विचारताच त्याने महिला बँकेत पैसे काढायला गेली असून थोड्याचवेळात आम्ही पळून जाणार आहोत. त्यानंतर पतीने दोघांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. 


पतीने पत्नी व तिच्या प्रियकराला भररस्त्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. लोकांनी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यानंतर पती व पत्नी दोघांनीही एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. महिलेच्या पतीने म्हटलं आहे की, आम्हाला तीन मुलं असूनही पतीने दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध ठेवले. 


महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पती मला सतत मारहाण करायचा व माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. म्हणून मी माझ्या वहिनीच्या घरी गेले होते आणि पैसे काढायला बँकेत गेले होते. याचवेळी माझ्या पतीने मला पुन्हा मारहाण करण्यास सुरू केली. या घटनेनंतर दोघांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 


पती-पत्नीमध्ये झालेले हे भांडण पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनाही धक्का बसला. दोघांमधील नाते तुटू नये म्हणून सगळ्यांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. अखेर मुलांची शपथ घालून दोघांची समजूत काढण्यात आली. मगच महिला पतीसोबत घरी जाण्यास तयार झाली.