उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका विक्षिप्त व्यक्तीने पत्नीचे नाक चावल्याचं कृत्य समोरं आलंय. या घटनेनंतर पत्नी गंभीर जखमी झाली. यानंतर तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावं लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बहराइच्या बेडनापूर इथल्या कोतवाली ग्रामीण परिसरातील आहे. रजनी देवी नावाची महिला बेदनापूरमधल्या विद्युत विभागात कर्मचारी आहे. रजनीचं तिचा पती ज्ञानदत्त पाठक यांच्याशी भांडण झालंय. यानंतर ती रागावली आणि तिच्या माहेरी गेली. 


भांडणानंतर ही महिला माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर पतीने तिची माफी मागितली आणि तिला पुन्हा बोलावून घेतलं. या दरम्यान घरातून बाहेर पडल्यानंतर पतीने फोन केला अन्य दोन साथीदारांसह बोलावून घेतलं. या परिस्थितीत त्याने पत्नीचे नाक चावलं. यामध्ये पत्नी इतकी गंभीर झाली की तिला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.


बोंडी पोलीस ठाण्यांतर्गत पाठकपट्टी रामगढी इथल्या 26 वर्षीय रजनी देवी या बेदनापूर उत्तमनगर वीज उपकेंद्रात कंत्राटी कामगार आहेत. पती ग्यानदत्त पाठक यांच्यासोबत काही वाद सुरू होते. या प्रकरणी बोंडअळी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


नेमकं काय घडलं?


पत्नी माहेरी परतत असताना पती ग्यानदत्तने तिकोरामोड चौकीजवळ तिला गाठलं आणि तिचं नाक दाताने कचकचून चावलं. त्या व्यक्तीने तिला मारहाणही केली. 


पीडितेची आई कुसुम तिवारी यांनी सांगितलं की, मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाची तक्रार दिली आहे. मुलीला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान या घटनेपासून घटनेपासून आरोपी फरार आहे.