भारतात सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याचा कुटुंबियांना अनेक सवलती दिल्या जातात. त्यामुळे आपल्या मुलासाठी सरकारी नोकरी करणारा नवरा मिळावा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. पाटबंधारे विभागातील एक विचित्र आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर पाटबंधारे विभागात एक नाही, दोन नाही तीन बायको नोकरीचा दावा करण्यासाठी पोहोचल्या होत्या. विशेष म्हणजे या तिन्ही बायकांजवळ लग्नाचे पुरावे म्हणून सगळेच कागदपत्र होती. हे पाहून पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी बुचकळ्यात पडले आहेत. 


काय आहे नेमकं प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष हा मटाटीला पाटबंधारे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कामाला होता. त्याचा कर्करोगामुळे 6 फेब्रुवारीमध्ये मृत्यू झाला. त्याचा मृत्यूनंतर तीन महिला वेगवेगळ्या ठिकाणाहून कागदापत्रासोबत नोकरीची मागणी करण्यासाठी पाटबंधारे विभागात पोहोचल्या. ही विचित्र घटना उत्तर प्रदेशातील आगरामधील आहे. पहिले तर तळबेहाटमधील क्रांती नावाची महिला सर्व कागदपत्रासह कार्यालयात आली आणि तिने नोकरीवर दावा केला. काही दिवसांनी भोपाळच्या सुनिता वर्मा नोकरीची मागणी करत कागदपत्रे घेऊन कार्यालयात हजर झाली. हे पाहून कार्यालयातील कर्मचारी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर मटाटीलामधील एक महिलादेखील मुलीने पुरावा म्हणून एसडीएमने दिलेले कौटुंबिक प्रमाणपत्रही कार्यालयात सादर करुन नोकरीवर दावा केला. विशेष म्हणजे या तिघींजवळ लग्नाची पत्रिका आणि फोटोदेखील होते. शिवाय या तिघेही आपण संतोषची पहिली पत्नी असल्याचा दावा केला आहे. 


या संपूर्ण घटनेनंतर पाटबंधारे विभागातील अधिकारी गोंधळे असून ते या सर्व प्रकरणाचा छडा लावत आहे. अधिकारी संतोषचे रेकॉर्ड शोधण्यात व्यस्त असून त्याचे बदली कुठे कुठे झाली त्या ठिकाणीचे त्याचा तपशील शोधत आहेत. पण त्याच्याबद्दल ठोस असं काही पुरावे मिळतं नाही आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांकडूनही संतोषची माहिती गोळा केली जातेय. 


कार्यकारी अभियंता पंकज सिंह सांगतात की, तिन्ही महिला स्वत:ला संतोषच्या पत्नी म्हणवत सांगत असून सर्व कागदपत्रेही त्यांनी सादर केलीय. लग्नाचे फोटो देखील दाखवले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन योग्य निर्णय आणि खऱ्या पत्नीला नोकरी देण्यात येईल असं सांगण्यात आलंय.