लखनऊ : करवा चौथच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी व्रत करतात. यावेळी पतीही आपल्या पत्नीला निराश न करता भेटवस्तू देतात. मात्र उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातील फरेंदा बुजुर्ग आणि कुनसेरवा गावातल्या दोन पतींनी आपल्या पत्नीला अनोखी भेट दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फरेंदा बुजुर्ग गावातील संतोष आणि कुनसेरवा गावातल्या जयप्रकाश त्रिपाठीने आपल्या पत्नींना भेटवस्तू म्हणून शौचालय भेट दिलं आहे. उघड्यावर शौचालयासाठी जावं लागू नये आणि भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरणा देघ या दोघांनी ही अनोखी भेट आपल्या पत्नींना दिली आहे.


शौचालय भेट मिळाल्याने या दोघांच्या पत्नींनी आनंद व्यक्त केला आहे.