नवी दिल्ली : लोकसभेत काही दिवसांपूर्वीच ट्रिपल तलाक विरोधी विधेयक पास झालं आहे. पण या संबंधित घटना कमी होताना काही दिसत नाही. उत्तर प्रदेशच्या इटाह जिल्ह्यातील एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका पतीने फक्त घरी येण्यासाठी थोडा उशीर झाल्याने घटस्फोट दिला आहे. पीडित महिलेने म्हटलं की, 'मी पतीला सांगितलं होतं की मी अर्ध्या तासात घरी येईल. पण ३० मिनिटात मी घरी पोहोचली नाही म्हणून पतीने मला तलाक दिला.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने म्हटलं की, ती तिच्या आजारी आजीला पाहण्यासाठी आईकडे गेली होती. पतीने म्हटलं की अर्ध्या तासात घरी परत ये. पण घरी येण्यासाठी १० मिनिटं उशीर झाल्याने पतीने यावर रागात तिला तलाक दिला. पतीने भावाच्या फोनवर कॉल केला आणि पत्नीला ३ वेळा तलाक म्हटलं. हे ऐकूण ती हैराण झाली.'


पीडित महिलेने तिच्या सासरच्या लोकांवर मारहाण करत असल्याचा देखील आरोप केला आहे. हुंडा न दिल्यामुळे तिचा छळ केल्य़ाचा आरोप देखील महिलेने केला आहे. अनेकदा मारहाणीमुळे तिचं अबॉर्शन देखील झाल्याचं महिलेने म्हटलं आहे. महिलेचे आई-वडील गरीब असल्याने सासरकडच्या मागण्या ते पूर्ण करु शकत नाहीत असं देखील महिलेने म्हटलं आहे.


टाईम्स नाऊच्या बातमीनुसार, पीडित महिलेने यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. सरकारने मला न्याय द्यावा. अन्यथा मी आत्महत्या करेल. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहे.


२७ डिसेंबरला तिहेरी तलाक विरोधी बिल लोकसभेत पास झालं होतं. जर याचं कायद्यात रुपांतर झालं तर आरोपीला ३ वर्षाची शिक्षा होऊ शकते.