नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यंत सिनेमातील प्रेम कहाण्या पाहिल्या असतील. मात्र, सिनेमातील दृश्यांप्रमाणेच आणि स्टोरी सारखीच एक घटना खरोखर घडली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...


त्याने प्रेमात दिलं बलिदान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कहाणी आहे प्रेमाच्या बलिदानाची... या स्टोरीतील नायक आहे एक पती, ज्याने आपल्या पत्नीची तिच्या प्रियकरासोबत भेट करुन दिली. इतकचं नाही तर या पतीने त्या दोघांचं परंपरा आणि विधीनुसार लग्नही लावून दिलं.


तिचं लग्न झालं मात्र...


उत्तर प्रदेशातील बिकापूर येथे राहणाऱ्या चंदाचं गावातच राहणाऱ्या सुरज नावाच्या तरुणासोबत प्रेम होतं. मात्र, घरच्यांच्या आग्रहास्तव चंदाने २०१२ साली फुलचंद नावाच्या तरुणासोबत लग्न केलं. लग्नानंतर फुलचंद चंदाला घेवून आपल्या घरी आला.


पती कामासाठी परगावी गेला आणि...


लग्नानंतर फुलचंदला कामासाठी जालंधरला जावं लागलं. त्यामुळे फुलचंद आणि चंदा यांचं कधीतरी फोनवर संभाषण होत असे. तर, चंदा ज्या गावात राहत होती त्याच गावात सुरजचे नातेवाईक राहत होते. त्यामुळे नातेवाईकांना फेटण्यासाठी सुरज नेहमीच गावात येत असे.


पतीला बसला जोरदार झटका


चंदा आणि सुरज यांच्यातील प्रेम काही कमी झालं नव्हतं त्यामुळे ते दोघे एकमेकांना भेटत असतं. दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी फुलचंद हा पत्नीला भेटण्यासाठी घरी आला आणि त्याने पाहिलेलं दृश्य पाहून त्याला एक जोरदार झटका बसला.


खूप राग आला आणि वाईट वाटलं पण...


चंदाने आपला पती फुलचंदला सर्व दागिने परत दिले आणि सर्वकाही सत्यही सांगितलं. "मला खूप आनंद होतोय की, चंदाने मला सर्वकाही सत्य सांगितलं. चंदाने सांगितल्यावर मला खूप रागही आला आणि वाईटही वाटलं. पण मी यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला" असं फुलचंदने सांगितले.


फुलचंदने मांडला प्रस्ताव


याप्रकरणी मी चंदाच्या वडिलांसोबत चर्चा केली आणि घरी परतल्यावर पंचायतीसमोरही एक प्रस्ताव मांडला. चंदा आणि सुरज यांना लग्न करण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव फुलचंदने मांडला.


मंदिरात विवाहबद्ध


फुलचंदने दिलेल्या प्रस्तावावर पंचायत आणि चंदा-सुरजच्या परिवाराने शिक्कामोर्तब केला. त्यानंतर सुरज-चंदा हे गावातील मंदिरात विवाहबद्ध झाले.


सत्य कळल्यानंतर एकीकडे पुरुष महिलांना मारहाण करतात तर दुसरीकडे फुलचंदने आपल्या पत्नीचचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावलं आहे. फुलचंदने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.