Crime News : प्रत्येक मुलगी लग्न, संसार, पती आणि सासरच्याबद्दल स्वप्न रंगवली असतात. ही नवरीदेखील लग्नानंतर सासरी पोहोचली पण नवरा नपुंसक आहे कळल्यावर तिच्या आयुष्यातील सर्व स्वप्न धुळीस मिळाली. त्यानंतर ती माहेरी निघून गेली आणि पुन्हा सासरी जाणार नाही असं ठाम सांगितलं. पण घरच्यांनी कशीबशी तिची समजूत काढून तिला सासरी पाठवलं. पण तिथे नियतीने तिच्यासाठी वेगळंच काही मांडून ठेवलं होतं. (husband is impotent have Physical relationship brother in law new bride Father in law forced video Crime News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने नवऱ्यासोबत संसार करायचं ठरवलं पण सासरच्या लोकांनी तिच्यावर वेगळीच जबदस्ती केली. नवरा नपुसंक आहे मग त्याच्या भावाशी अनैतिक संबंध ठेव, अशी बळजबरी सासरच्या मंडळी तिच्यावर केली. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली तिने या अवैध नात्याला नकार दिला. तर दिराने तिच्यावर घरच्यासमोर जबदरस्ती करत बलात्कार केला. एवढंच नाही तर त्यान तिचा अश्लिल व्हिडीओदेखील बनवला. धक्कादायक म्हणजे हा व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन दिर तिच्यावर वारंवार बलात्कार करायचा. 


ही भयानक घटना उत्तर प्रदेशातील बरेली इथे घडली आहे. हा सगळा प्रकार तिच्या नवऱ्याला समजताच त्याने पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्याच कुटुंबाच्या अनैतिक कृत्याबद्दल पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांनी सासरच्यांविरोधात एफआयआर नोंदवली नाही, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडितीने पोलिसांना सांगितलं की, 25 जूनला मीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील तरुणाशी तिचं लग्न झालं. मधुचंद्राच्या रात्री तिला कळलं की तिचा नवरा नपुंसक आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिने सासूला तिच्या मुलाबद्दल सांगितलं. पण त्यांनी तिला चूप राहण्यास सांगितले. सासूच्या वागण्याचा तिला धक्काच बसाल. त्यानंतर तिने माहेरच्या लोकांना सगळा प्रकार सांगितला. पण त्यांनीही तिला फारसा प्रतिसाद दिला नाही. 


29 ला नवं वधू सासरी आली.  सासू आणि सासऱ्यांनी वधूला दिराशी संबंध ठेवण्यास सांगितलं. मात्र वधूने याला विरोध केला. त्यानंतर दिराने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडीओही बनवला, असं तिने सांगितलं. याबद्दल तू वाचा फोडशील तर जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितीने हिम्मत कर आपल्या भावाजवळ तिच्यासोबत झालेला सगळा न्याय सांगितला. नवऱ्यालाही तिच्यावरील भयानक घटनेबद्दल समजलं. बहिणीला या भयानक संकटातून वाचविण्यासाठी ती गावातील लोकांना घेऊन तिच्या सासरी पोहोचला. 


त्यानंतर पीडितीने मीरगंज पोलीस ठाण्यात सासरच्या विरोधात तक्रार केली. पण पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. मात्र मीरगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी राजीव कुमार सिंह यांनी सांगितले की, आम्ही तक्रार नोंदवली असून आपण तपास करत असल्याचं सांगितलं.