दिवाळीत घरी आणा Mahindra ची SUV; दमदार Scorpio Boss लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

देशातील प्रमुख एसयुव्ही वाहन निर्माता कंपनी Mahindra ने घरगुती बाजारात आपली नवी एसयुव्ही Scorpio Boss एडिशनला लाँच केलं आहे.   

| Oct 18, 2024, 17:19 PM IST

देशातील प्रमुख एसयुव्ही वाहन निर्माता कंपनी Mahindra ने घरगुती बाजारात आपली नवी एसयुव्ही Scorpio Boss एडिशनला लाँच केलं आहे. 

 

1/8

देशातील प्रमुख एसयुव्ही वाहन निर्माता कंपनी Mahindra ने घरगुती बाजारात आपली नवी एसयुव्ही Scorpio Boss एडिशनला लाँच केलं आहे.   

2/8

ही नवी एसयुव्ही Scorpio Classic मॉडेलवर आधारित आहे. यामध्ये कंपनीने काही नवे फिचर्स आणि अॅक्सेसरीजचा समावेश केला आहे जे तिला रेग्युलर मॉडेलपेक्षा उत्तम बनवतात.  

3/8

सणांच्या पार्श्वभूमीवर लाँच करण्यात आलेल्या या स्पेशल एडिशनला डीलर लेव्हलचं अपग्रेड मिळतं. पण अद्याप या एसयुव्हीची किंमत किती असेल याचा खुलासा झालेला नाही.   

4/8

फ्रंट ग्रिल आणि फॉग लॅम्प हाऊसिंगसह बाहेरच्या बाजूला क्रोम एम्बेलिशमेंटला डार्क करण्यात आलं आहे. तर बोनट स्कूप, रिअर क्वार्टर ग्लास, हेडलँप आणि टेल-लँपलाही डार्क क्रोमने सजवण्यात आलं आहे.   

5/8

Scorpio Classic स्पेशल एडिशनमध्ये रेन वायजर, फ्रंट स्किड प्लेट, कोटिंग रिअर गार्ड आणि रियर व्ह्यू कॅमेरा जोडण्यात आला आहे.   

6/8

या एसयुव्हीच्या केबिनमध्ये काळ्या रंगाची सीट अपहोल्स्ट्रीसह कंफर्ट किटदेखील आहे. यामध्ये कुशन, नेक पिलो दिला जात आहे.   

7/8

Scorpio Classic च्या या स्पेशल बॉस एडिशनमध्ये इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये कंपनीने 2.2 लीटर क्षमतेच्या फोर-सिलेंडर डिझेल इंजिनचा वापर केला आहे.   

8/8

हे इंजिन 132hp ची पॉवर आणि 300Nm चा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 6-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे.