Weird News : कोणाचा ही मृत्यू हा कधीच मस्करी किंवा तुलनेचा विषय होऊ शकत नाही. मृत्यू हे जीवनाचं शेवटचं सत्य आहे. जो प्रत्येकाला एक दिवस येणारच आहे. कोणताही जवळचा व्यक्ती गेला की, त्याचं दु:ख हे असतंच. निधनाची बातमी फोनवर मिळाल्यानंतर आपण ती इतरांना सांगताना खूपच गंभीर किंवा शांतपणे सांगत असतो. पण एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून तुमचा ही संताप होईल. एका व्यक्तीला त्याच्या 21 वर्षाच्या मेहुण्याच्या निधनाची बातमी मिळते. ही बातमी पत्नीला सांगण्यासाठी असा मार्ग निवडला की, लोकं आता त्याला ट्रोल करु लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावाच्या मृत्यूनंतर महिलेने हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, महिलेने सांगितले की, माझा नवरा माझ्या बहिणीशी फोनवर बोलत होता. माझ्या पतीने फोनवर बोलणे संपवले आणि मला विचारले की तू तुझ्या बहिणीचा फोन का उचलला नाहीस. मग मी सांगितले की माझा फोन चार्ज आणि व्हायब्रेशन मोड वर आहे. यानंतर माझ्या पतीने जे केले ते पाहून मी थक्क झाले. त्याने मला सांगितले की तुझ्या कुटुंबात कोणीतरी मरण पावले आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. मी थरथर कापत होते. मी त्याला विचारले की कोणाचं निधन झालंय. त्यावेळी तो माझ्यासोबत खेळ खेळत होता.


ती महिला पुढे म्हणाली की, तो खूप विचित्रपणे हसला आणि म्हणाला की, अंदाज लाव की कोणाचा मृत्यू झाला असावा. मी पुन्हा विचारल्यावर मला तेच उत्तर दिले. यानंतर माझा धीर सुटला आणि मला माझ्या बहिणीला फोन करून विचारावे लागले की आमच्या कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला आहे.


महिलेने आपल्या बहिणीला फोन केल्यानंतर तिला कळालं की, तिच्या 21 वर्षाच्या भावाचं निधन झालंय. बाईक अपघातात त्याचा मृत्यू झालाय. एवढ्या लहान वयात भाऊ जगाचा निरोप घेणं हे आमच्या कुटुंबासाठी खूप दु:खद होतं. तर माझ्या पतीला ही बातमी खेळासारखी वाटली. नंतर मी 6 तासांच्या प्रवासासाठी एकटीच निघाली. पती नाराज झाला की मी त्यांना माझ्या आईवडिलांच्या घरी का घेऊन जात नाही, पण अशा वागण्यानंतर मी त्यांना माझ्यासोबत नेले असते हे शक्यच नव्हते.


सोशल मीडियावर अशा असंवेदनशीलतेबद्दल महिलेच्या पतीवर टीका होत आहे. त्याला लोकांनी चांगलेच फटकारले आहे.