Husband Secret: पती पत्नी हे नातं जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे. नात्याची वीण ही पती-पत्नी या दोघांच्या हाती असते. विश्वास हा या नात्याचा मजबूत पाया असतो. हे नातं व्यवस्थित राहावं यासाठी प्रत्येक क्षणी प्रयत्न करावे लागतात. कारण संसार हा अनेक अडचणी आणि संघर्षांनी भरलेला असतो. पण काही जणांच्या मते, लग्नानंतर पत्नी पतीवर वर्चस्व गाजवतात. काही जणांच्या मते ते खरंही असू शकतं. पती कायम आपल्या पत्नीसमोर आपलं स्वच्छ व्यक्तिमत्त्व ठेवतात. अनेकदा तसं ठेवण्याचा प्रयत्न असतो, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अनेकदा लग्नानंतर पुरुषांना आपली आवडती कामं करता येत नाही. त्यामुळे पत्नी माहेरी गेली की, पतीला मोकळं रान मिळतं. आज आम्ही तुम्हाला पतीला एकांत मिळाल्यावर काय करतात? अशा गोष्टी सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉयलेटमध्ये जास्त वेळ घालवणे: पत्नी माहेरी गेल्यावर बहुतांश पती विचित्र गोष्टी करतात. ते फोनसोबत तासन् तास टॉयलेटमध्ये वेळ घालवतात. कधी कधी लोक तिथे लॅपटॉप आणि टॅबलेटही घेतात. यासोबतच अनेकजण पॉटवर बसून वर्तमानपत्र वाचतात.


जुन्या मित्रांसोबत फोनवर चर्चा: प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्या वाढतात, त्यामुळे अनेक वेळा पुरुषांना त्यांच्या जुन्या मित्रांशी बोलता येत नाही. पण पत्नी घरी नसताना तो जुन्या मित्रांशी तासनतास बोलतात. अनेक वेळा काही जण त्यांच्या मैत्रिणींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.


टीव्हीवर आवडते चित्रपट आणि मालिका पाहणे: अनेक महिलांना टीव्हीवर मालिका पाहण्याची आवड असते, त्यामुळे अनेक वेळा पुरुषांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी पाहता येत नाहीत. पण पत्नीच्या गैरहजेरीत नवरा टीव्हीचा ताबा घेतो. टीव्हीवर जुने सामने, चित्रपट आणि बातम्या पाहतात.


मित्रांसोबत पार्टी: पत्नी घरी नसते तेव्हा पुरुष आपल्या मित्रांना घरी बोलावतात आणि पार्टी करतात. आपल्या पद्धतीने या क्षणांचा आनंद लुटतात. पत्नी खूप दिवसांसाठी माहेरी गेली असेल, तर ही योजना हमखास आखली जाते. यावेळी पार्टीसाठी मोकळं रान असतं. 


आवडता पदार्थ बनवणे: सहसा महिला घरातील स्वयंपाकघरात अन्न शिजवतात. पण अनेक पुरुषांना स्वयंपाकाचीही आवड असते. असे लोक पत्नीच्या गैरहजेरीत स्वतःचे जेवण स्वतः शिजवतात.