SDM Jyoti Maurya Story:  उत्तर प्रदेशची एसडीएम ज्योती मौर्य (SDM Jyoti Maurya) प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा चांगलीच रंगली आहे. नवऱ्याने लग्नानंतर स्वखर्चाने ज्योती मौर्य यांना शिकवले. मात्र, अधिकारी होताच त्यांनी पतीच्या विरोधात गेली व सासरचे लोक हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला. तसा गुन्हाही दाखल केला. या घटनेनंतर युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या महिलांना त्याच्या पतीने पुन्हा घरी बोलवल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा दावा किती सत्य आहे याची पडताळणी आम्ही केली आहे. (SDM Jyoti Maurya Update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2010साली ज्योतीचे लग्न अलोक यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर पुढील शिक्षण सुरू ठेवण्याची तिची इच्छा होती. आलोकने ज्योतीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या कमाईतून ज्योतीला शिकवलं. एका चांगल्या कोचिंग सेंटरमध्येही तिचे अॅडमिशन केले. पण अधिकारी होताच ज्योतीने सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला. 


ज्योतीच्या नवऱ्याने मात्र तिचे आरोप फेटाळून लावले आहेत. अधिकारी झाल्यानंतर 2020मध्ये तिची मनीष दुबे नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. मनीष होमगार्ड कमांडंट आहे. अलोकने ज्योती आणि मनीष दोघांनाही रंगेहाथ पकडले होते. सोशल मीडियावर सध्या हे प्रकरण चांगलंच गाजते आहे. ज्योती मौर्य हिने शिकवून मोठं करणाऱ्या नवऱ्याचा विश्वासघात केल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. प्रयागराजमध्ये 135 जणांनी परीक्षेची तयारी करणाऱ्या त्यांच्या पत्नींना पुन्हा घरी बोलवून घेतलं आहे, असा दावा सोशल मीडियावर केला जातोय. तर काही महिला युजर्सने केलेल्या दाव्यानुसार, ज्योती मौर्यच्या प्रकरणामुळं त्यांच्या पतीने पीसीएसची तयारी मध्येच बंद करायला सांगितली.


सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या दाव्यांमध्ये काहीएक तथ्य नसल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेले दावे खोटे असल्याचे कोचिंग सेंटरच्या मालकांचे म्हटले आहे. तर, स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विवाहित महिलांनीही या साऱ्या अफवा फक्त सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहे. प्रत्यक्षात यातच काहीच घडलेले नाही, असं म्हटलं आहे. 


एका कोचिंग सेंटरच्या मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोणीही आभ्यास सोडून परत गेलेले नाहीये. सर्वकाही आधीसारखच सुरु आहे. सोशल मीडियावरील दावे खोटे आहेत. सर्व विवाहित महिला रोज कोचिंग सेंटरमध्ये येतात आणि अभ्यास करुन परत जातात.