मुंबई : पती आणि पत्नी (Husband Wife) यांच्यातील नातं हे कायम मैत्रीचं असावं. आणि ही मैत्री दोन्ही बाजूने असावी. दोघं एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य घालवत असतात. सुख-दुःखात कोणत्याही कठीण प्रसंगात दोघं एकमेकांसोबत खंबीर उभे राहतात. कधी तरी आपल्या जवळच्या व्यक्तीला सुधारण्यासाठी किंवा त्याच्या भल्यासाठी काही कठीण पाऊलं उचलावी लागतात. 


पतीच्या भल्यासाठी पत्नीने उचललं टोकाचं पाऊल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नीला तिच्या पतीच्या स्वभावाची चांगलीच जाणीव आहे. तिला माहित आहे की जर पती ऐकत नाही, तर त्याला कशा पद्धतीने समजवायचे. कित्येकदा पत्नी आपल्या पतीला समजवण्यासाठी एक विचित्र पद्धत अवलंबते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, आजारी पती त्याच्या पलंगावर बसलेला दिसतो आणि त्यानंतरच पत्नी त्याच्या तापाचे मोजमाप करते. ताप आल्यावर पत्नीने त्याला औषध घेण्यास सांगितले, परंतु पतीने स्पष्ट नकार दिला. याचवेळी पत्नी एक टोकाच पाऊल उचलते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


औषध खात नसल्यामुळे पत्नीने केलं असं काही


बायकोने अनेक वेळा सांगितले तरी पतीने ऐकले नाही. यावर बायकोला खूप राग आला आणि मग नवऱ्याला औषध खायला देण्यासाठी एक विचित्र पद्धत अवलंबली. त्यानंतर पत्नीने रागाच्या भरात पतीला कानाखाली मारली आणि नंतर त्याला औषध घेण्यास सांगितले. यावर पती शांत झाला आणि शांतपणे औषध घेण्यास तयार झाला. काही सेकंदांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. पंजाबी कपल नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला.