Crime News : हैद्राबादमधून (Hyderabad Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या एका 45 वर्षीय फार्मासिस्टने हैद्राबादमध्ये कथितपणे त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबियांना आर्सेनिकसह विष देऊन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पत्नी आणि तिच्या कुटंबियांना मीठ आणि मिरची पावडरमध्ये आर्सेनिक मिसळून मारण्याची योजना आखली होती. यानंतर घरातील सर्वजण आजारी पडले होते. जूनमध्ये उपचारादरम्यान आरोपीच्या सासूचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवल्याने पती तिच्यावर रागावला होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केले असे पोलिसांनी (Hyderabad Police) सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादमध्ये राहणाऱ्या ब्रिटनस्थित फार्मासिस्टने मसाल्यांमध्ये आर्सेनिक मिसळून पत्नी आणि सासरच्या मंडळींना मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आरोपीच्या सासूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 45 वर्षीय आरोपीची पत्नी बराच वेळापासून त्याच्यापासून वेगळी राहत होती. काही महिन्यांपूर्वीच तिने पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. त्यामुळे तो खूप चिडला होता. याच रागातून त्याने पत्नीच्या संपूर्ण कुटुंबियांना संपवण्याचा निर्णय घेतला होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मियापूर पोलीस ठाण्यात आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत खून, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचे मित्र आणि तक्रारदार पत्नीच्या नातेवाईकांसह सहा जणांना 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. तर फार्मासिस्ट फरार आहे.


2018 मध्येच दोघांचे लग्न झाले होते. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर दोघेही काही दिवस हैदराबादमध्ये राहिल्यानंतर हे जोडपं नंतर ब्रिटनला गेले. आरोपीने पत्नीची पूर्ण काळजी घेण्याचे आश्वासन दिले. महिलेची तिची मुलगीही होती. ब्रिटनला पोहोचल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यात भांडणे सुरू झाली. तक्रारीनुसार, पतीने महिलेला मारहाण केली होती. यानंतर ती पतीचे घर सोडून माहेरी आली. नुकतीच तिने पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. त्याचाच पतीला राग होता.


भावाच्या लग्नासाठी महिला मुलीसह भारतात परतली होती. या लग्नासाठी आरोपीसुद्धा हैदराबादला आला होता. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या नातेवाईकांना जुलाब, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे महिलेच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे जूनमध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच तक्रारदार महिला आणि तिच्या मुलीलासुद्धा जुलाब होऊ लागले. त्यानंतर आई आणि मुलगी दोघी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका डॉक्टरकडे उपचारासाठी गेल्या. तपासण्या केल्यानंतर त्यांना आर्सेनिकमुळे विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.


कशी आखली हत्येची योजना?


यानंतर महिलेनं पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या घरी जेवण केलेल्या सर्व कुटुंबीय आणि नातेवाईकांची तपासणी केली, ज्यात त्यांच्या शरीरात आर्सेनिक मोठ्या प्रमाणात आढळून आले. महिलेले पोलिसांना सांगितले की तिला तिचे नातेवाईक आणि चौकीदाराच्या मुलावर संशय आहे. पोलिसांनी सर्वांची चौकशी केली असता महिलेच्या पतीने तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मित्रांना नातेवाईकांच्या मदतीने तिच्या घरी पाठवले. त्यांनी महिलेच्या घरातील स्वयंपाकघरात ठेवलेले मीठ आणि मिरची पावडरमध्ये आर्सेनिक मिसळले. याचेच ते कित्येक दिवस सेवन करत होते. ज्यामुळे महिलेच्या आईचा मृत्यू झाला.