फ्रिज, दगड कापण्याच्या मशीन अन् सुटकेस... लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने गर्लफ्रेंडचे केले तुकडे
Hyderabad Crime : आठवड्याभरापूर्वी प्रेयसीला संपवून प्रिकराने तिच्या मृतदेहाचे तुकडे विविध भागात फेकले होते. पोलिसांनी तपासानंतर आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये दहशतीचे वातावारण निर्माण झालं आहे.
Crime News : हैदराबादमधल्या (Hyderabad News) एका घटनेने दिल्लीतील निर्घृण श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची (Shraddha Walker case) आठवण करुन दिली आहे. हैदराबादमध्ये (Hyderabad Crime) एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे दगड कापण्याच्या मशीनने तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकले आहेत. पोलिसांनी (Hyderabad Police) या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपीने आधी महिलेचे डोके वेगळे केले. त्यानंतर हात पाय कापून धड वेगळे केले. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना 17 मे रोजी या महिलेचे कापलेल शीर कचऱ्यात आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. आठवडाभरानंतर पोलीस आरोपींपर्यंत पोहोचत या प्रकरणाचा छडा लावला आहे.
हैदराबादमध्ये 17 मे रोजी थिआगलगुडा रोडजवळील कचऱ्याच्या डब्यामध्ये एका महिलेचे डोके पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले आढळले होते. पोलिसांना तात्काळ याची माहिती देण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर हे महिलेचे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना महिलेच्या ओळख पटली. अनुराधा रेड्डी असे या महिलेचे नाव असल्याचे समोर आले. आठवड्याभरानंतर पोलिसांनी या प्रकरणात 44 वर्षात बी. चंद्र मोहन याला अटक केली आहे.
पोलिसांनी बुधवारी या महिलेच्या लिव्ह इन पार्टनरला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. बी चंद्रमोहन (44) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, चंद्रमोहनने अनुराधा रेड्डी (55) या महिलेचा भोसकून खून केला आणि नंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी बुधवारी या महिलेच्या लिव्ह इन पार्टनरला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. बी चंद्रमोहन (44) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, चंद्रमोहनने अनुराधा रेड्डी (55) या महिलेचा भोसकून खून केला आणि नंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. हैदराबाद पोलिसांना 17 मे रोजी शहरातील मुसी नदीजवळील कचऱ्याच्या डब्यात एक शीर सापडले होते. आरोपीने महिलेच्या पीडितेच्या शरीराचे काही भाग कापून फ्रीझमध्ये ठेवल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते.
बी.आर. चंद्र मोहन शेअर बाजारात ऑनलाइन ट्रेडिंगचे काम करत होता. मृत महिला आणि आरोपी दोघेही गेल्या 15 वर्षांपासून एकत्र राहत होते. मृत महिला पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर ती चंद्रमोहन याच्यासोबत चैतन्यपुरी कॉलनी, दिलसुखनगर येथे राहत होती. तर अनुराधा रेड्डी ही व्याजावर पैसे देत होती. मोहनने तिच्याकडून सुमारे 7 लाख रुपये घेतले होते. ही रक्कम परत करू शकला नाही. अनुराधा रेड्डी त्याच्यावर पैशांसाठी दबाव टाकला होता. याच रागातून त्याने अनुराधा रेड्डीला संपवण्याचा निर्णय घेतला.
कशी केली हत्या?
12 मे रोजी चंद्रमोहन अनुराधासोबत भांडण करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. चंद्रमोहनने तिच्या छातीवर आणि पोटावर वार करून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर चंद्रमोहनने मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन लहान दगड कापण्याची मशीन खरेदी केली. त्यानंर या मशिनने चंद्रमोहनने मृतदेहाचे तुकडे केले आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. त्यानंतर 15 मे रोजी चंद्रमोहनने अनुराधाचे कापलेले डोके कचऱ्याच्या डब्यात फेकले.