मुंबई : हैदराबाद येथील शादनगरमध्ये 26 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मन हेलावून टाकणाऱ्या अवस्थेत महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. अर्धवट जळलेल्या स्थितीतील या मृतदेहाने सर्वांचेच मन सुन्न केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असन ट्विटरवर देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत. महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला आहे. लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर ही कोल्लुरूमध्ये पशु चिकित्सक केंद्रात कार्यरत होती. बुधवारी त्यांनी टोल प्लाझाजवळ आपली स्कूटी पार्क करून कामावर पोहोचली. रात्री त्या कामावरून पुन्हा आल्या तेव्हा पार्क केलेली स्कूटी पंक्चर झाली होती. 


महिलेने तात्काळ बहिणीला फोन करून सगळा प्रकार सांगितला. एवढंच नव्हे तर आपल्याला भीती वाटत असल्याचं देखील बोलली. जवळपास फक्त लोडिंग ट्रक आणि अनोळख्या व्यक्ती आहेत. त्यावर बहिणीने त्यांना स्कूटर टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने येण्यास सांगितलं. तसेच काही लोक आपल्याला मदतीची ऑफर करत असल्याचं देखील त्यांनी बहिणीला सांगितलं.


पोलिसांना महिला डॉक्टरांच्या बहिणीला दिलेल्या जबाबानुसार, काही वेळाने त्यांनी महिलेला फोन लावला मात्र त्यांचा फोन स्विच ऑफ लागला. घाबरलेल्या कुटुंबियांनी सर्वात प्रथम टोल प्लाझाला पीडित महिलेला शोधण्याचा प्रयत्न केला. त्या न सापडल्यामुळे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.


गुरूवारी सकाळी पोलिसांना हेदराबाद-बंगलुरू हायवेजवळ एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळवर जाऊन पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर महिलेच्या कुटुंबियांशी संपर्क केला. ज्यांनी कपडे आणि गळ्यातील लॉकेटवरून प्रियांकाची ओळख पटवली. 


या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासला जात आहे. सोबतच डॉक्टर महिलेला  त्या रात्री कोणत्या व्यक्तीकडून मदत ऑफर केली गेली होती. याची देखील चौकशी केली जात आहे. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. महिलेला न्याय मिळावा याकरता नेटीझन्सही एकवटले आहेत.