मुंबई : हैदराबादमध्ये पीडीत डॉक्टर तरूणीवर सामुहिक बलात्कार करून तिला जीवंत जाळण्यात आलं. या हत्याकांडाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत निर्भया हत्याकांड घडलं. यानंतर 7 वर्षांनीही महिला भारतात सुरक्षित नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 नोव्हेंबर रोजी हैदराबाद पीडित डॉक्टर तरूणीवर 4 जणांनी सामुहिक बलात्कार केला आहे. आरोपी स्कूटीचे टायर बदलण्याच्या कारणाने पीडित तरूणीला आपल्या सोबत घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. ही घटना बुधवारी रात्री 9.30 ते गुरूवारी पहाटे 4 वाजेपर्यंत घडली. त्यानंतर त्यांनी पीडित तरूणीला जीवंत जाळलं आहे. या घटनेचे पडसाद भारतभर पसरले आहेत. या आरोपींना सगळ्यांसमोर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जात आहे. 


महिला आयोगाकडून देखील या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. हैदराबाद हत्याकांडातील मुख्य आरोपी मोहम्मद पाशाला सर्वात प्रथम पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी भारताच्या जनतेची मागणी आहे. 


पीडित तरूणीच्या बहिणीने आपण या घटनेला गांभीर्याने घ्यायला हवं होतं, अशी खंत व्यक्त केली आहे. माझी बहीण इतकी घाबरली होती की, तिला 100 नंबरवर फोन करणं सुचलं नाही. त्यामुळे यापुढे सगळ्यांनी काळजी घ्या, अशी भावना पीडित तरूणीच्या बहिणीने व्यक्त केली आहे.