अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप; आमदाराच्या मुलाचा सहभाग? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
देशात बलात्कारांसारख्या घटनांवर आळा घालण्यासाठी अनेक कायदे करण्यात आलेत.
हैदराबाद : देशात बलात्कारांसारख्या घटनांवर आळा घालण्यासाठी अनेक कायदे करण्यात आलेत. मात्र या कायद्यानंतरही बलात्कारांसारख्या घटना काही थांबल्या नाहीत. दररोज देशाच्या अनेक ठिकाणी एक ना एक बलात्काराची घटना घडतचं आहे.अशाच एका घटनने आता हैदराबाद हादरलं आहे. अल्पवयीन तरूणीवर उच्चभ्रू वसाहतीत सामुहिक बलात्काराची घटना घडलीय. या घटनेत एका आमदाराच्या पोलिसाचा हात असल्याचा संशय आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हैदराबादमधील उच्चभ्रू वसाहत असलेल्या जुबली हिल्समध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. आरोपींनी अल्पवयीन तरूणीला मर्सिडीज कारमध्ये नेत सामूहिक बलात्कार केला. आरोपींमध्ये तीन ते चार जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये एक अल्पवयीन तरूण आहे, तर अन्य आरोपींपैकी एक आमदाराचा मुलगा असल्याचा संशय आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पीडितेच्या वडिलांनी जुबली हिल्स पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध आयपीसी कलम 354, 323 आयपीसी, 9,10 पॉक्सो कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच 17 वर्षीय पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आयपीसीचे कलम 376 देखील जोडले आहे. मात्र आतापर्यंत या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार,२८ मे रोजी त्यांची मोठी मुलगी एका पार्टीला गेली होती, मुलीचे मित्र सूरज आणि हादी यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. या घटनेत संध्याकाळी 5.30 च्या सुमारास काही लोक माझ्या मुलीला लाल रंगाच्या मर्सिडीज कारमधून पबच्या बाहेर घेऊन गेले. यादरम्यान एक इनोव्हा कारही बाहेर आली. कारमधील लोकांनी माझ्या मुलीशी गैरवर्तन केले. तेव्हापासून माझी मुलगी शॉकमध्ये आहे. सध्या तरी ती संपूर्ण घटनेचा खुलासा करू शकली नाही, असे वडिलांनी म्हटलेय.
सुत्रांच्या माहितीनूसार, एका आमदाराचा मुलगा आणि अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष पीडितेसोबत पार्टीत उपस्थित होते. सध्या पीडित व्यक्ती फक्त एका आरोपीला ओळखू शकतेय. हा आरोपीही अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.