Hyundai कडून 3 लोकप्रिय कारचे उत्पादन बंद; जाणून घ्या कारण
Hyundai Motor Indiaने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक सॅन्ट्रोचे 6 पेट्रोल मॉडेल आलेली ग्रँड i10 निओस हॅचबॅकचे 2 डिझेल मॉडेल आणि Aura सेडानचे 2 डिझेल मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : Hyundai Santro Nios Aura 10 Model Discontinued: भारतातील कार विक्रीमध्ये बऱ्याच दिवसांपासून परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. ह्युंदाई मोटर इंडियाचीही स्थिती पूर्वीसारखी चांगली राहिलेली नाही. अशा परिस्थितीत Hyundai Motors ने आपल्या 3 प्रसिद्ध कारचे मॉडेल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Hyundai ने भारतातील लोकप्रिय हॅचबॅक Santro चे सर्व पेट्रोल प्रकार तसेच Grand i10, Nios आणि Aura चे सर्व डिझेल मॉडेल्स बंद केले आहेत.
आता फक्त Hyundai Santro चे सीएनजी मॉडेल्स विकले जातील. Hyundai Grand i10, Nios आणि Hyundai Aura चे पेट्रोल आणि CNG मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. जोपर्यंत या कारचे बंद केलेले मॉडेल डीलरशिपकडे उपलब्ध आहेत. तोपर्यंत त्यांची विक्री सुरू राहील.
Hyundai ने सेडान Aura च्या डिझेल प्रकारांमध्ये Aura S आणि Aura SX+ AMT मॉडेल्स बंद केले आहे. Hyundai ने त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक सॅन्ट्रोचे सर्व पेट्रोल प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यानंतर आता फक्त Santro CNG विक्रीसाठी उपलब्ध असेल.
भारतात हळूहळू डिझेल वाहनांची संख्या कमी होत आहे आणि कार कंपन्या पेट्रोललाही पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत कार कंपन्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारला भविष्य मानत आहेत. या प्रयत्नात Hyundai ने या 3 कारचे एकूण 10 प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात, टाटा मोटर्स ह्युंदाईला टक्कर देत आहे आणि ते एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकामागून एक कार ऑफर करीत आहेत. टाटा आता हॅरियर आणि सफारीचे पेट्रोल मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे.