हैदराबाद : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जातो. राहुल गांधी सध्या दोन दिवसांच्या हैदराबाद दौऱ्यावर आहेत. त्यावेळीही राहुल गांधींना लग्नाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा माझं काँग्रेसशीच लग्न झालं आहे असं सांगून राहुल गांधींनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आहे. २०१९ साली नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. भाजपला २०१९ मध्ये २३० जागाही मिळणार नाहीत, अशी भविष्यवाणीही राहुल गांधींनी केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये इतर पक्षांची आघाडी झाल्याचा फटका भाजपला बसेल, असं राहुल गांधींना वाटतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ ला पंतप्रधान कोण होणार या प्रश्नाचं उत्तर मात्र राहुल गांधींनी दिलं नाही. याबद्दल नंतर निर्णय घेऊ असं राहुल गांधी म्हणाले. राज्यातील काँग्रेस समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली. तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार येईल. तसंच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या वाईट कामगिरीची पुनरावृत्ती होणार नाही, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.


देशात वाढणाऱ्या असहिष्णुतेमुळे अल्पसंख्याक समुदायात भीतीचं वातावरण आहे. वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन मोदींना पूर्ण करता आलं नाही, अशी टीकी राहुल गांधींनी केली.