`I Love You` म्हणत काढली महिला शिक्षिकेची छेड; व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी घडवली अद्दल
महाविद्यालयात एका महिला शिक्षिकेला आय लव्ह यू म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी वर्गातील इतर मुली शिक्षीकेकडे पाहून जोरजोरात हसत होत्या.
'I Love You' इंग्रजी भाषेतील हे तीन शब्द प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीप्रती असलेले प्रेम व्यक्त करायचं असेल तर ती या शब्दांद्वारे व्यक्त होते. पण जर कोणी हे जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला तर तो अतिरेक वाटू लागतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये (Meerut) पाहायला मिळालाय. मेरठच्या किठोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या महिला शिक्षिकेला 'आय लव्ह यू' म्हणत छेड काढली. विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Students molesting class teacher in classroom)
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील डॉ. राम मनोहर स्मारक इंटर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकाला आय लव्ह यू म्हणत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकाराने महिला शिक्षिकेने नाराज होऊन शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांविरुद्ध आता कारवाई करण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थी वर्गात शिक्षकलेला "आय लव्ह यू" म्हणताना दिसत आहेत. यावेळई शिक्षिका तिचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करते. यावेळी वर्गात बसलेल्या विद्यार्थिनी हसताना दिसत आहेत. आणखी एका व्हिडिओमध्ये, मुले अशाच प्रकारे छेडछाड करताना दिसत आहेत, ज्याकडे शिक्षकडे शिक्षिकेने दुर्लक्ष केले.
व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध आयटी अॅक्ट आणि विनयभंगाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येत आहेत. शाळेतील बारावीचे तीन विद्यार्थी अनेक दिवसांपासून त्रास देत आहेत. यात एक विद्यार्थिनीही त्यांच्यासोबत होती, असे शिक्षकाने तक्रारीत म्हटले आहे.