हैदराबाद: नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (CAA) विरोध करणारे एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्यावर भाजप खासदार धर्मपुरी अरविंद यांनी जळजळीत शब्दांत टीका केली आहे. मी असदुद्दीन ओवेसी यांना शेवटचा इशारा देतो. अन्यथा मी त्यांना क्रेनला उलटा टांगेन आणि त्यांची दाढी भादरून टाकेन. ही दाढी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना लावून मी ओवेसींना बढती देईन, असे वक्तव्य धर्मपुरी अरविंद यांनी केले. त्यामुळे तेलंगणामधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता ओवेसी या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी धर्मपुरी अरविंद यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. असदुद्दीन ओवेसी शुक्रवारी निजामाबाद येथे नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला ( NRC)विरोधी करण्यासाठी सभा घेणार होते. या सभेला धर्मपुरी अरविंद यांनी विरोध केला होता. अखेर तेलंगणा सरकारने या सभेला परवानगी नाकारली होती. 



असदुद्दीन ओवेसी म्हणतात की, नागरिकत्व सुधारणा कायदा असंवैधानिक आणि धार्मिक आहे. ते देशात फूट पाडण्यासाठी सभा घेत आहेत. ते पाकिस्तान आणि बांगलादेशच्या लोकांसाठी लढा देत आहेत का? ओवेसींची कृती ही राष्ट्रविरोधी आहे. त्यामुळे ओवेसींना तुरुंगात डांबले पाहिजे, असेही धर्मपुरी अरविंद यांनी म्हटले होते.