IAC Vikrant : देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (IAC Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २ सप्टेंबर २०२२ रोजी पहिली भारतीय बनावटीची विमानवाहक नौका IAC विक्रांत (Indigenous Aircraft Carrier Vikrant) नौदलाला सुपूर्द करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IAC विक्रांत सेवेत दाखल होताच नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होईल. विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल करण्याचा कार्यक्रम कोच्ची (कोचीन) येथील बंदरात पार पडेल. IAC विक्रांत नौकेला कोच्ची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये पंतप्रधान कमिशन करतील.   


भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात कोटींच्या घरात


भारतीय नौदलाच्या सेवेतील INS विक्रांत या विमानवाहक नौकेने पाकिस्तान विरुद्ध 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता IAC विक्रांत नौदलात कमिशन झाल्यानंतर INS विक्रांत हे नाव धारण करेल. विक्रांत या विमानवाहक नौकेवर एकावेळी 1600 नौसैनिक कार्यरत असतील. तर 30 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर यांचा ताफा या विमानवाहक नौकेवर सज्ज ठेवला जाईल. INS विक्रांत सेवेत आल्यामुळे भारतीय नौदलाकडे कार्यरत असलेल्या विमानवाहक नौकांची संख्या दोन होणार आहे.


#LegendisBack #IACVikrant - equipped with State-of-the-Art facilities is a 'City on the Move' @indiannavy @IN_WNC @INEasternNaval1 @IN_HQSNC pic.twitter.com/3IWKJPGiEJ


— IN (@IndiannavyMedia) August 30, 2022


भारताच्या समुद्रातील सीमा बंगालचा उपसागर, हिंद महासागर आणि अरबी समुद्र या तीन समुद्रांशी जोडलेल्या आहेत. यामुळे मोठ्या युद्धासाठी किमान दोन आणि कमाल तीन विमानवाहक नौका  भारताकडे असाव्या अशा स्वरुपाची सूचना अनेक संरक्षणतज्ज्ञांनी केली आहे. आता भारताकडे विक्रमादित्य आणि विक्रांत या दोन विमानवाहक नौका उपलब्ध असतील. यामुळे देशाच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. 



 विक्रांतवर 30 विमाने तैनात करण्यात येणार आहेत


 विक्रांतवर 30 विमाने तैनात असतील. त्यापैकी 20 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर असतील. त्यांनी सांगितले की, सध्या विक्रांतवर मिग-29 के लढाऊ विमाने तैनात केली जातील.  त्यानंतर टीईडीबीएफ म्हणजेच दोन इंजिन डेकवर आधारित फायटर जेट डीआरडीओ आणि एचएएलद्वारे तैनात केले जातील.


वाचा : बाळासाहेबांच्या आशीर्वादाने विक्रांत बचाव मोहिम, किरीट सोमय्या यांचा मोठा दावा


कारण TEDBF पूर्णपणे तयार होण्यासाठी काही वर्षे लागू शकतात, यादरम्यान अमेरिकेची F-18A सुपर हॉर्नेट किंवा फ्रान्सची राफेल (M) तैनात केली जाऊ शकते. या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या सुरू झाल्या असून अंतिम अहवालानंतर कोणती लढाऊ विमाने तैनात करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. घोरमाडे म्हणाले की, यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून विक्रांतवर मिग-29 लढाऊ विमाने तैनात करण्यास सुरुवात होईल.