वायुसेनेच्या विमानावर चिमणी आदळली, पायलटने इंधन टाकी आणि बॉम्ब खाली टाकले आणि...
भारतीय वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान अपघात होता होता वाचले.
नवी दिल्ली : अंबालामध्ये गुरुवारी भारतीय वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान अपघात होता होता वाचले. या भागातून उड्डाण घेणाऱ्या जॅगुआर लढाऊ विमानाचे एक इंजिन आणि चिमणीची टक्कर झाली. या अपघातातून वाचण्यासाठी पायलटने विमानचे फ्युअल टॅंकर खाली सोडले. या वेळी छोट्या सरावासाठी वापरले जाणारे काही बॉम्ब देखील पायलटने खाली सोडले.
विमानातून सर्व सामान खाली सोडल्याने अंबाला एअरफोर्स स्थानकाजवळ आग लागली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहीका, पोलीस आणि एअरफोर्सचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
जग्वार लढाऊ विमानावर चिमणी आदळल्यानंतर पायलटने फ्यूल टॅंक आणि छोटे बॉम्ब खाली सोडले. त्यानंतर अंबाला एअर बेसवर विमान उतरवले. यामुळे मोठा अपघात होता होता टळला. पण खालच्या परिसरात आग आणि काळ्या धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची चौकशी सुरु आहे.