नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना भारतात आणण्यासाठी वायुसेनेचे प्रतिनिधी शुक्रवारी वाघा बॉर्डरवर जाणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे. परंतु पाकिस्तान अभिनंदनला आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसकडे सोपवणार की भारतीय अधिकाऱ्यांकडे ते अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनंदन यांचे मिग-२१ विमान बुधावारी सकाळी पाकिस्तानकडून विमानांच्या सहाय्यानं हल्ला चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले. तेव्हापासून अभिनंदन पाकिस्तानमध्ये आहेत. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ लढावू विमान जमीनदोस्त केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरूवारी संसदेत अभिनंदन यांना शुक्रवारी सोडण्यात येण्याची घोषणा केली.


अभिनंदन यांच्या सुटकेच्या बातमीने देशाभरात आनंदाची भावना व्यक्त केली जात आहे. भारताने अभिनंदची सुटका कोणत्याही अटीशर्तींवर अवलंबून नसल्याचे सांगितले. भारताने केलेल्या दबावानंतर पाकिस्ताकडून अभिनंदन यांची सुटका करण्यात येत आहे. अभिनंदन यांची सुटका केल्याने तणाव कमी होणार असेल तर अभिनंदन यांना शांततेच्या मार्गाने सोडणार असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.