IAS Athar Amir Khan and Mehreen Qazi Love Story: आयएएस अधिकारी टीना डाबी (Tina Dabi) यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर आयएएस अधिकारी अतहर आमिर खान (IAS Athar Amir Khan) यांनी दुसरं लग्न केलं. संपूर्ण देशात राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच या देखण्या अधिकाऱ्याच्या लग्नानंही अनेकांच्या नजरा वळवल्या. अतहर आमिर खान यांनी  डॉक्टर मेहरीन काजी (Mehreen Qazi) शी लग्नगाठ बांधली. आता या सुरेख वैवाहिक नात्याला एक महिना उलटला असतानातच अतहर यांच्या पत्नीनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्या जोडीदाराविषयीच्या भावना व्यक्त केल्या. लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांचा रोमँटिक अंदाज सर्वांनी पाहिला आणि सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु झाली. (IAS Love Story mehreen qazi shares romatic post for husband Athar Amir Khan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सात जन्मांचं ठाऊक नाही, पण जोपर्यंत श्वास घेतेय तोपर्यंत माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका तुझंच नाव घेत राहील', असं लिहित तू मला आतापर्यंतची सर्वात उत्तम प्रेमकहाणी अनुभवण्याची संधी दिली आहेस ही भावना मेहरीननं शब्दांत मांडली. 


अधिक वाचा : परदेशी जाताना आता पाळीव प्राण्यालाही विमानातून प्रवास करण्याची मुभा, अशी होणार व्यवस्था


 


वादळी दिवसांमध्ये तूच माझी शांतता आहेस... वाईटातल्या वाईट प्रसंगात तूच माझी स्थिरता आहेस, कोणत्याही संकटानंतर परतण्यासाठीचं माझं हक्काचं घर तूच आहेस... इतक्या सुरेख भावनांची गुंफण करत मेहरीननं अतहर यांच्यावर असणारं प्रेम पहिल्यांदाच जगासमोर व्यक्त केलं. 



लाल रंगाचा लेहंगा, हातांवर गडद रंग धरलेली मेहंदी आणि चेहऱ्यावर आनंदाची सुरेख झलक अशा रुपातला एक फोटो तिनं पोस्ट केला. या फोटोमध्ये अतहरही रुबाबदार लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा फोटो पाहून बऱ्याच नेटकऱ्यांनी 'Made in heaven' अर्थात ही जोडी स्वर्गातच बनल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. 




पत्नीनं व्यक्त केलेल्या या भावना पाहून अतहर यांनीही तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं. 'तुझी साथ मिळाल्यामुळे मी ऋणी आहे.. तू माझं आयुष्य सुरेख केलंयस', असं म्हणत त्यांनीही जाहीरपणे या नात्याची ग्वाही दिली. गेल्या काही दिवसांपासून अतहर आमिर खान हे कोणा एका अभिनेत्यालाही टक्कर देतील इतके लोकप्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आहे.