बारावीत नापास, पण पहिल्याच प्रयत्नात UPSC पास, अशी आहे IAS अंजू शर्मा यांची कहाणी
खरंतर त्यांनी आयुष्यात मिळालेल्या अपयशाचं यशात रूपांतर केले.
मुंबई : UPSC परीक्षा उत्तीर्ण होणे हे सहजासहजी शक्य नाही, कारण ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. जी पास होण्यासाठी खूप मेहनत आणि अभ्यास करावा लागतो. ज्यामुळे फार कमी लोक या परीक्षेत पास होतात. परंतु आज आपण अशा IAS अधिकारी बद्दल बोलणार आहोत, ज्या 12वी मध्ये काही विषयात नापास झाल्या होत्या, पण त्यांनी आपल्या महनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर वयाच्या 22 व्या वर्षी UPSC च्या परीक्षेत यश मिळवले.
खरंतर त्यांनी आयुष्यात मिळालेल्या अपयशाचं यशात रूपांतर केले.
अंजू शर्मा या बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये नापास झाल्या होत्या आणि दहावीच्या रसायनशास्त्राच्या प्रिलियम्समध्येही त्या नापास झाल्या होत्या. परंतु इतकं असून देखील त्यांनी UPSC परीक्षा पास केली.
आपल्या यशाबद्दल सांगताना अंजू शर्मा म्हणाल्या की, ''लोक आपल्याली अपयशासाठी नाही, तर यशासाठीच आठवण काढतात.''
त्यांच्या आयुष्यातील या दोन घटनांनं त्याचे भविष्य घडवले, असा अंजू शर्मा यांचा विश्वास आहे.
अंजू यांनी एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, 'प्रिलियम्स दरम्यान मला खूप धडे वाचायचे होते आणि जेवणानंतर खरंतर ते मला वाचायचे होते. मग मी घाबरायला लागले, कारण माझा संपूर्ण अभ्यास झाला नव्हताआणि मला माहित होते की मी नापास होणार आहे. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाने 10वीच्या वर्गातील कामगिरी किती महत्त्वाची आहे यावर भर दिला कारण त्यामुळेच आपलं पुढचं करिअर घडणार असतं.'
अपयशानंतर आईकडून अशी मिळाली साथ
या कठीण काळात अंजू शर्मा यांच्या आईने त्यांना धीर दिला आणि प्रेरणा दिली. शेवटच्या क्षणी अभ्यासावर अवलंबून राहू नये हा धडाही त्यांनी आयुष्यात शिकला. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच कॉलेजच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यामुळे त्यांनी कॉलेजमध्ये सुवर्णपदक मिळवला होता. त्यांनी जयपूरमधून बीएससी आणि एमबीए पूर्ण केले.
याच रणनीतीमुळे अंजू शर्मा यांना पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास होण्यास मदत झाली. त्यांनी आधीच त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता, ज्यामुळे त्या IAS टॉपर्सच्या यादीत सामील झाल्या.
IAS अंजू शर्मा सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत?
अंजू शर्मा यांनी 1991 मध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. ते सध्या प्रधान सचिव आहेत, सरकारी शिक्षण विभाग (उच्च आणि तंत्रशिक्षण), सचिवालय, गांधीनगर.
त्यांनी गांधीनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून आणि भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी NRHM मध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवा देखील केली आहे.