Assam Floods : आजू - बाजूला पाण्याचा घेर आणि चिखल.  कोणी मदतीची हाक देतंय तर कोणाचा रडण्याचा आवाज कानावर पडतोय. भूक, तहान विसरुन स्वत:ला किंवा आपल्या कुटुंबाला वाचवण्याची धडपड सुरु आहे. ही परिस्थिती सध्या आसाममध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाममध्ये पूर आणि भूस्खलन झाल्यामुळे परिस्थिती गंभीर असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.  आसाममधील 27 जिल्ह्यांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नागरिकांचे घरं वाहून गेली असून राहण्यासाठी जागा नाही. पुरात नागरिकांचे संपूर्ण घर, संसार उदध्वस्त झाले आहेत. मात्र परिस्थिती कितीही गंभीर असली तर नागरिकांना वाचवण्यासाठी एक महिला देवा सारखी धावून आली आहे. या महिलेची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. 


आसामच्या पूरस्थितीदरम्यान व्हायरल होणारी महिला कोण?


आसाममधील परिस्थिती गंभीर असताना एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आसामच्या कछार जिल्ह्यातील उपायुक्त IAS कीर्ति जल्ली असं महिलेचं नाव आहे. फोटोत कीर्ति यांनी साडी परिधान केले आहे. कीर्ति यांनी आसामच्या नागरिकांना वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात स्वत: उतरुन मदतीचा हात पुढे केला आहे.


नागरिकांना वाचवण्यासाठी कीर्ती यांची धडपड - 


कीर्ती यांच्या एका फोटोमध्ये त्या बोटीतून प्रवास करताना दिसतायेत. आजू बाजूला पाणी असताना अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी IAS कीर्ती यांची धडपड सुरु आहे. तर एका फोटोत अडकलेल्या महिलेला वाचवल्यानंतरचा फोटो अवनीश शरण नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 


कीर्ती यांच्या कार्याने नेटकऱ्यांकडून कौतुकांचा पाऊस - 


कीर्ती यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे नेटकऱ्यांनी चांगलच कौतुक केलं आहे. नेटकऱ्यांनी कीर्ती यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्यागराज स्टेडिअममधील फोटो केला आहे. ज्यामध्ये आपल्या कुत्र्याला इव्हेनिंग वॉक करण्यासाठी एका IAS अधिकारीने खेळाडुंना 7 वाजता सराव बंद करण्याचा आदेश दिला होता. अधिकारी संजीव खिरवार यांचा स्टेडिअममधील फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी कीर्ती यांचं कौतुक केलं आहे.