नवी दिल्ली : एखाद्या गोष्टीचा ध्यास असा काही उरी बाळगा की वाटेतली प्रत्येक गोष्ट तुम्हाला ध्येय्यपूर्तीच्याच दिशेनं नेईल. हरियाणा येथील बहादुरगढमध्ये राहणारी प्रिती हुड्डा हिच्या जीवनाला मिळालेली कलाटणी याचीच प्रचिती देत आहे. हिंदी माध्यमातून तिनं लेखी परीक्षा आणि प्रकट मुलाखतीची फेरी पार करत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची कमाल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रितीला यानंतर आयएएससाठी निवडण्यात आलं. तिचे वडील दिल्ली परिवहन निगम (DTC) मध्ये बस चालक म्हणून सेवेत होते. आपली मुलयी आयएएस अधिकारी झाल्याचं कळालं तेव्हाही ते याच सेवेत कार्यरत होते. 


जेएनयूतून शिक्षण 
प्रिती हुड्डा हिला इयत्ता दहावीमध्ये 77 टक्के आणि बारावीमध्ये 87 टक्के गुण होते. यानंतर दिल्लीतीलच लक्ष्मीबाई महाविद्यालयातून तिनं हिंदीतून पदवी शिक्षण घेतलं. ज्यामध्ये तिला 76 टक्के गुण मिळाले. यानंतर तिनं जेएनयू विद्यापीठातून हिंदीतू एम.फिल आणि पीएचडीचं शिक्षण घेतलं. 


बीबीसीशी संवाद साधताना आपण कधी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करु अशी अपेक्षाही केली नसल्याचं प्रितीनं सांगितलं. कुटुंबातून इतकं शिक्षण घेणारी प्रिती पहिलीच मुलगी. वडिलांचं स्वप्न होतं की त्यांच्या मुलीनं आयएएस अधिकारी व्हावं, पुढे विद्यापीठातून शिक्षण घेताना प्रितीला परीक्षेच्या तयारीसंबंधीची माहिती मिळाली, ज्यानंतर तिनं तयारी सुरु केली. 


UPSC च्या परीक्षा म्हटलं की 12 तास अभ्यास वगैरे अशीच एक धारणा तयार झाली आहे. पण, प्रितीनं याला शह दिला. सातत्यानं 10-12 तास अभ्यास करण्याऐवजी एक दिशा ठरवून त्या रोखानं अभ्यास करण्याची गरज आहे, असा विचार करणाऱ्यांपैकी प्रिती एक. परीक्षेच्या अभ्यासासोबतच दंगामस्तीही तितकीच गरजेची आहे, चित्रपट पाहणंही गरजेचं आहे असं म्हणज प्रितीनं आत्मविश्वासानं हळूहळू तयारी सुरु केली. पुस्तक वाचनाचा मारा करण्याऐवजी तिनं निवडक गोष्टींना प्राधान्य देत त्याच दिशेनं अभ्यास सुरु केला आणि अतिशय सहजपणे आयएएस होण्याचं हे शिखर गाठलं.