नवी दिल्ली : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतात. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं इंटरनेटमुळे लक्ष विचलित होत असल्याचे अनेकदा ऐकायला मिळतात. पण आयएएस अधिकारी संजीता महापात्रा यांची कहाणी पूर्णपणे वेगळी आहे. त्यांनी इंटरनेटच्या मदतीने तयारी तर केलीच पण UPSC परीक्षेतही यश मिळवले. मात्र, संजिता यांच्यासाठी हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम आयआयटी कानपूरमधून बी.टेक
संजीता महापात्रा यांचा जन्म राउरकेला, ओडिशा येथे झाला आणि त्यांनी सुरुवातीचे शिक्षण ओडिशामधूनच केले. यानंतर त्यांनी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतला आणि आयआयटी कानपूरमधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बीटेक पदवी प्राप्त केली.



UPSC परीक्षेत सलग 3 वेळा अपयश
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, संजीता महापात्राचे लहानपणापासूनच आयएएस होण्याचे स्वप्न होते, त्यामुळे त्यांनी बीटेक केल्यानंतर यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पूर्वतयारीच्या अभावामुळे त्यांना पहिल्या तीन प्रयत्नांत प्रिलिम परीक्षाही पास करता आली नाही.


सरकारी नोकरीत रुजू झाल्या संजीता
UPSC परीक्षेत सलग तीन वेळा नापास झाल्यानंतर संजीता महापात्रा सरकारी नोकरीत रुजू झाल्या. मात्र, त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, नोकरी करून परीक्षेचा अभ्यास करणं फार कठीण आहे. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. संजीता महापात्राचे युपीएससीच्या तयारीदरम्यान लग्न झाले.



अखेर मिळालं यश


त्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले, पण त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. सासरच्या लोकांच्या पाठिंब्याने संजिता यांनी चौथ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली, मात्र यावेळीही त्यांना यश मिळाले नाही. मात्र गेल्या तीन प्रयत्नांपेक्षा चौथ्या प्रयत्नात चांगलं यश मिळालं.  यानंतर त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि 2019 मध्ये पाचव्या प्रयत्नात यश मिळवले. संजिता यांनी संपूर्ण भारतात 10वी रँक मिळवून आयएएस होण्याचे स्वतःचे स्वप्न पूर्ण केले.