ना कोचिंग ना शहरातील मोठा खर्च! रेल्वेच्या फ्री wifi वर हमाल झाला थेट IAS
असं म्हणतात एखाद्या व्यक्तीने निश्चय केला तर तो कोणतही कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तुमची जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी तुमच्या यशाचा मार्ग सुकर करते. अशीच एक प्रेरणादायी कहानी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
IAS Sreenath K Success Story: असं म्हणतात एखाद्या व्यक्तीने निश्चय केला तर तो कोणतही कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तुमची जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी तुमच्या यशाचा मार्ग सुकर करते. अशीच एक प्रेरणादायी कहानी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काही वर्षांपूर्वी हमालीचं काम करणारा व्यक्ती आयएएस अधिकारी झाला आहे. युपीएससीच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी प्रेरणादायी गोष्ट ठरत आहे.
युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लाखो उमेदवार अथक मेहनत घेत असतात. दिवसरात्र अभ्यासात घालवतात. कोचिंगवर लाखो रुपये खर्च करतात. परंतू केरळच्या एका उमेदवाराने रेल्वे स्टेशनवर हमाली करून युपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
केरळच्या श्रीनाथ यांनी आपल्या प्रतिकुल परिस्थितीला कधीही दोष दिला नाही. त्यांनी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा वापर करीत अभ्यासावर लक्ष्य केंद्रीत केले. याआधी त्यांनी केरळ पब्लिक सर्विस कमीशनच्या परीक्षांमध्येही यश संपादन केले होते.
श्रीनाथ यांच्याकडे कोचिंगसाठी पैसे नसल्याने त्यांनी इंटरनेटवर अभ्यास सुरू केला. रेल्वे स्टेशनवर असलेल्या फ्री वायफायचा वापर करीत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. स्मार्टफोनच्या माध्यमांतून त्यांनी सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला. हे फ्री वायफाय त्यांच्यासाठी एखादे वरदान ठरले.
युपीएससीच्या पहिल्या 4 प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. परंतू चौथ्या प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले. याच वायफायच्या मदतीने त्यांनी थेट 2018 साली युपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. श्रीनाथ आज आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील त्यांच्या मेहनतीचं कौतुक केलं होतं तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.